News Flash

#MeToo : दिग्दर्शक मुकेश छाबडाला दणका, फॉक्स स्टारकडून करार रद्द

'किज और मौनी' या चित्रपटामध्ये सुशांत आणि संजना सांघवी एकत्र स्क्रिन शेअर करत आहे.

मुकेश छाबडा

बॉलिवूडमध्ये सध्या ‘मी टू’ या मोहिमने चांगलाच जोर धरला असून याअंतर्गंत अनेक बड्या कलाकारांची पोलखोल होत आहे. यात आता सुशांत सिंह राजपूतचं नावदेखील जोडलं गेलं आहे. विशेष म्हणजे सुशांत सोबतच ‘किज और मौनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबडा हेदेखील अडचणीत आले आहेत.

‘किज और मौनी’ या चित्रपटामध्ये सुशांत आणि संजना सांघवी एकत्र स्क्रिन शेअर करत आहे. या चित्रपटादरम्यान सुशांतने लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संजनाने केला आहे. संजनाच्या आरोपानंतर सेटवर महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचं म्हणत फॉक्स स्टारने दिग्दर्शक मुकेश छाबडा यांच्यासोबतचे सारे करार रद्द केले आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओने ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

‘किज और मौनी’या चित्रपटाचं दिग्दर्शन मुकेश छाबडा करत असून चित्रपटाच्या सेटवर महिलांसोबत असभ्य वर्तन घडत आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. हे कदापि सहन होण्यासारखी घटना नाही. स्टार इंडिया एक नावाजलेली संस्था आहे. त्यामुळे चित्रपटच्या सेटवर होत असलेल्या या घटना पाहता आम्ही मुकेश छाबडा यांच्यासोबतचे करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असं फॉक्स स्टार स्टुडिओने शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जोपर्यंत अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि मुकेश छाबडा यांची कास्टिंग कंपनी हा वाद सोडवत नाही तोपर्यंत हे करार रद्द करण्यात येणार असल्याचंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी मुकेश छाबडा यांच्यावरही काही महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. चित्रपटात काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल, असा आरोप एका महिलेने केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:34 pm

Web Title: mukesh chhabra fired from kizzie aur manny
टॅग : MeToo
Next Stories
1 दिग्दर्शकाने सांगितलं रेप सीनमध्ये बिनधास्त जबरदस्ती करा, दलिप ताहिल यांचा धक्कादायक खुलासा
2 सिद्धार्थ चांदेकर घेऊन येतोय ‘सिनेमा कट्टा’
3 झाशीची राणी आणि माझ्यात ‘हे’ एकच साम्य – कंगना रणौत
Just Now!
X