‘शक्तिमान’ या लोकप्रिय सुपरहिरो मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले मुकेश खन्ना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी कपिल शर्मा शोवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी महिलांच्या ‘मी टू’ या चळवळीवर निशाणा साधला. “महिलांचे घराबाहेर पडणे हेच समस्येचे मूळ आहे” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने संताप व्यक्त केला आहे. प्रतिष्ठित लोकांकडून प्रतिगामी विचारांची अपेक्षा नाही असा टोला तिने लगावला आहे.
अवश्य पाहा – KBC मुळे अमिताभ झाले करोडपती; एका एपिसोडचं मानधन पाहून व्हाल थक्क
How regressive & outdated is that! It’s cringeworthy when people at respectable positions make such remarks.
Misogyny may be a result of a traumatic memory or past. That’s the only benefit of doubt I can think of.
With due respect – I condemn this statement of Mukesh ji! https://t.co/E98DBaqOBX— Divyanka T Dahiya (@Divyanka_T) November 1, 2020
अवश्य पाहा – आम्ही सारे ‘वेगन खवय्ये’; मांसाहार सोडून हे कलाकार झाले शुद्ध शाकाहारी
“मुकेश खन्ना यांचं हे वक्तव्य त्यांच्या प्रतिगामी विचारांचं प्रदर्शन करतं. प्रतिष्ठित लोक अशी विधान करतात तेव्हा लाज वाटते. महिलांप्रती त्यांच्या मनात असलेला द्वेष कदाचित एखाद्या वाईट अनुभवामुळे निर्माण झाला असेल. त्यांची विचित्र विधान ऐकली की मला हाच संशय येतो. पण तरी देखील मुकेशजी मी तुमच्या विचारांचा निषेध करते.” अशा आशयाचं ट्विट करुन दिव्यांकाने आपला संताप व्यक्त केला आहे.
यापूर्वी काय म्हणाले होते मुकेश खन्ना?
मुकेश खन्ना यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. “महिलांचे काम आहे घर सांभळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधीपासून सुरु झाली जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केली” अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी या व्हिडीओमध्ये केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 4:42 pm