News Flash

अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलताच मुकेश खन्ना यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चित्रपटाच्या नावावर टीका केली होती..

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर मुकेश खन्ना यांनी आनंद व्यक्त केला.

नुकताच मुकेश खन्ना यांनी आजतकला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘हे केव्हाच व्हायला हवे होते. मला असे वाटते की सोशल मीडियामुळे अक्षय कुमार आणि त्याच्या टीमला असे करावे लागले असणार. यापुढे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटाचे नाव ठेवताना थोडा विचार करतील. आता सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे हे सर्वांना कळाले आहे’ असे म्हणत मुकेश खन्ना यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर लक्ष्मी बॉम्बचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या नावावर टीका केली होती. ‘या चित्रपटाचे शिर्षक लक्ष्मी बॉम्ब ठेवण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती का? माझ्या मते अजीबात नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता का? नाही ना. मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवले?’ असे म्हटले होते. आता चित्रपटाचे नाव बदलताच त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 3:50 pm

Web Title: mukesh khanna on akshay kumar changing laxxmi bombs name avb 95
Next Stories
1 अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?
2 आर माधवनच्या चित्रपटात शाहरुख साकारणार भूमिका?
3 ‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध
Just Now!
X