News Flash

मास्क लावून दिसला शक्तिमान, चाहत्यांना लवकरच मिळणार सरप्राइज

मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केली आहे

नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ त्यावेळी शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. आता शक्तिमानच्या चाहत्यांना लवकरच एक सरप्राइज मिळणार आहे.

शक्तिमाने हे पात्र साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये शक्तिमान थोड्या वेगळ्या अंदाजात दिसत आहे. शक्तिमानने मास्क लावून फोटो शेअर केला आहे. तसेच शक्तिमानच्या शेजारी उभे असणाऱ्या व्यक्तीने देखील मास्क लावले आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा फोटो शेअर करत ‘मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर लवकरच काही तरी नवीन घेणार आहे. वाट पाहा आणि तुम्हीच जाणून घ्या’ असे त्यांनी कॅप्शन दिले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. तसेच या पोस्टनंतर चाहत्यांनी अनेक तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

Something new will come on my Bheeshm International You tube channel. Just Wait and Watch.

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna) on

अनेकांनी कमेंट करत शक्तिमान पुन्हा भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी करोना विषयी जागरुकता पसरवण्यासाठी मुकेश खन्ना खास एपिसोड शूट करत असल्याचे म्हटले आहे.

पाहा : शक्तिमान मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात?

नव्वदच्या दशकात दूरदर्शन वाहिनीवरील ‘शक्तिमान’ ही एक लोकप्रिय मालिका होती. अनेक लहान मुलांनी तर शक्तिमान प्रमाणे उडण्याचा देखील प्रयत्न केला होता. मालिका १३ सप्टेंबर १९९७ साली सुरु झाली होती आणि २७ मार्च २००५ मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता पुन्हा एकदा शक्तिमान प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सर्वचजण आनंदी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:32 pm

Web Title: mukesh khanna shared shaktimaan picture in mask viral on social media avb 95
Next Stories
1 संजय लीला भन्साली यांनी सुशांतला ऑफर केले होते ४ चित्रपट?
2 करण जौहर वैतागला; टीकाकारांना टाळण्यासाठी शोधला ‘हा’ मार्ग
3 सुशांतला न्याय द्या; सलमान खान विरोधात २९ लाख लोकांनी केल्या सह्या
Just Now!
X