‘शक्तिमान’ या लोकप्रिय सुपरहिरो मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले मुकेश खन्ना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी कपिल शर्मा शोवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी महिलांच्या ‘मी टू’ या चळवळीवर निशाणा साधला. “महिलांचे घराबाहेर पडणे हेच समस्येचे मूळ आहे” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर गायिका सोना मोहापात्रा हिने संताप व्यक्त केला आहे. पुरुष घरातील स्त्रियांचे शोषण करत नाही का? असा रोखठोक सवाल तिने मुकेश खन्ना यांना केला आहे.

अवश्य पाहा – Halloween Night 2020: हे चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका

अवश्य पाहा – आम्ही सारे ‘वेगन खवय्ये’; मांसाहार सोडून हे कलाकार झाले शुद्ध शाकाहारी

“होय, मुकेश खन्ना यांच्या मते पुरुष घरातील स्त्रियांवर आणि लहान मुलांवर अत्याचार करत नाहीत. आपल्या सभोवताली अशा विचित्र मानसिकतेचे लोक आहेत. हेच आपल्या समाजातील कटू सत्य आहे. परिवर्तनाचा वेग थोडा कमी आहे पण परिवर्तन होणारच” अशा आशयाचं ट्विट करुन सोना मोहापात्रा हिने मुकेश खन्ना यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी काय म्हणाले होते मुकेश खन्ना?

मुकेश खन्ना यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. “महिलांचे काम आहे घर सांभळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधीपासून सुरु झाली जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केली” अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी या व्हिडीओमध्ये केलं आहे.