24 November 2020

News Flash

#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान

त्यांचा जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

अभिनेते मुकेश खन्ना हे सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कपिल शर्मा शोवर टीका करत शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शिर्षकावर आक्षेप घेतला होता. आता मुकेश खन्ना यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते मीटू चळवळीवर बोलताना दिसत आहे.

सध्या ट्विटरवर मुकेश खन्ना यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात असे म्हटले आहे. ‘महिलांचे काम आहे घर सांभळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधी पासून सुरु झाली जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केली’ असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलताच मुकेश खन्ना यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुढे त्यांनी, ‘आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करतात. पण मी तुला सांगू इच्छितो की समस्या इथूनच सुरु होतात. सर्वात पहिले याचा परिणाम कोणावर होत असेल तर घरातील लहान मुलांना. त्यांना आईचे प्रेम मिळत नाही’ असे म्हटले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 1:25 pm

Web Title: mukesh khanna viral video controversy comment on women avb 95
Next Stories
1 ‘ब्रह्मास्त्र’मधील २५-३० मिनिटांचा भाग काढून टाकणार? दिग्दर्शक व निर्मात्यांमध्ये मतभेद
2 KBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
3 हिना खानच्या वडिलांनी ब्लॉक केले तिचे क्रेडिट-डेबिड कार्ड; अभिनेत्रीला बसला धक्का
Just Now!
X