01 March 2021

News Flash

‘क्रिश’, ‘रा-वन’ला टक्कर देणार शक्तिमान

मुकेश खन्ना यांनी केली शक्तिमानवर आधारित चित्रपटांची घोषणा

नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ या पहिल्यावहिल्या भारतीय सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. त्यावेळी शक्तिमान हे पात्र साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना अतिशय लोकप्रिय होते. पण एक दिवस अचानक ही मालिका बंद झाली. पण आता शक्तिमानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आता चक्क शक्तिमानच्या चित्रपटांची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुकेश खन्ना यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘शक्तिमान’ सीरिजच्या आगामी तीन चित्रपटांची घोषणा केली आहे. ‘आता लोकांना सांगण्याची वेळ आली आहे की शक्तिमान पुन्हा येणार आहे. मी शक्तिमानवर आधारित तिन नवे चित्रपट घेऊन येत आहे. लवकरच या चित्रपटांबाबत माहिती देण्यात येईल. सध्या इतकच सांगेन की मोठ्या प्रोडक्शन कंपनीसोबत काम करत आहे. तसेच मी असं म्हणू शकतो की हा चित्रपट क्रिश आणि रा-वन चित्रपटांना टक्कर देईल’ असे मुकेश खन्ना यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आता शक्तिमानवर आधारित चित्रपट येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटांमध्ये कोणते कलाकार दिसणार? चित्रपटाचे चित्रीकरण कुठे होणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

शक्तिमान मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात? पाहा

शक्तिमान ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. आठवड्यातून केवळ एकदाच प्रदर्शित होणारी ही मालिका जवळपास १२ वर्ष टीव्हीवर सुरु होती. या मालिकेचा शेवटचा भाग २००५ साली पोगो वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी शेवटच्या भागापर्यंत शक्तिमानच्या टीआरपीमध्ये घट झाली नाही. परंतु काही आर्थिक मतभेदांमुळे ही मालिका बंद करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 1:54 pm

Web Title: mukhesh khanna promises shaktimaan trilogy films avb 95
Next Stories
1 ‘मी जिवंत आहे’, श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री
2 सहा महिन्यांनी सलमान शूटिंगसाठी सेटवर; फोटो शेअर करत सांगितला अनुभव
3 कतरिनाच्या घरी जाऊन विकी कौशलने घेतली भेट; चर्चांना उधाण
Just Now!
X