चित्रपटातील भूमिका वस्तुदर्श आणि स्वाभाविक वाटावी म्हणून आज कलाकार कितीही मेहनत करायला व त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलिकडील अनुभव म्हणजे मुक्ता बर्वेने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी. या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे.

PHOTO : रिंकू राजगुरूच्या ‘कागर’ची अॅक्शन सुरू!

चित्रपटाची कथा दोन स्त्रियांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला नावाच्या मुक्ताच्या व्यक्तिरेखेसाठी विणकाम शिकणे गरजेचे होते. मुक्ताने ते अल्पावधीतच शिकून घेतले आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या या व्यक्तिरेखेसाठी उठवला. स्त्री सशक्तीकरणाचा एक आगळा वस्तुपाठ या व्यक्तिरेखेतून रसिकांना अनुभवायला मिळेलच, पण त्याचबरोबर रसिकांसमोर येईल ती या चित्रपटातील अभिनेत्रींनी घेतलेली मेहनत आणि त्यातून दिसलेली त्यांची प्रतिभा. नावाप्रमानेच ही दोघींची कथा…. त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच… विचार वेगळे पण आवड एकच…त्या वेगळ्या, पण तरीही एकच…. ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची.

चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

”आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखीत होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल,’ असे दिग्दर्शक प्रतीमा जोशी म्हणाल्या.
‘आम्ही दोघी’ येत्या २३ फेब्रुवारी २०१८ ला प्रदर्शित होईल.