News Flash

‘बाबा… तुमच्याशिवाय…’, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

'मुलगी झाली हो' या मालिकेत ही अभिनेत्री काम करताना दिसत आहे.

‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारी अभिनेत्री श्वेता अंबिकरच्या वडिलांचे निधन झाले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे श्वेताने याबाबत माहिती दिली आहे.

श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘बाबा… तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड आहे’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Ambikar (@shweta_ambikar)

श्वेताने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत आर्याची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिने ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘बाजी’, ‘तू माझा सांगाती’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील माऊ, आर्या, सिद्धांत, दमयंती, विलास ही सर्वच पात्र कायमच चर्चेत असतात. या मालिकेचे गोव्यात चित्रीकरण सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी ते बंद करण्यात आले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 6:23 pm

Web Title: mulagi jhali ho fame shweta ambikar father passed away avb 95
Next Stories
1 लेकीचे पत्र पाहून शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल
2 …तर पूर्ण चेहरा भिंतीवरील फ्रेममध्ये दिसेल -सोनू निगम
3 “या देशात मुर्खांची कमी नाही..”, मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेतील गर्दी पाहून स्वरा भास्कर संतापली
Just Now!
X