स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील माऊ ही कायमच चर्चेत असते. तिने ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक डान्स व्हिडीओ चर्चेत आहे.
‘मुलगी झाली हो’ मालिकेतील माऊ म्हणजे दिव्या सुभाषचा सिद्धांतसोबतचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्या दोघांनी ‘एक नारळ दिलाय’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मालिकेत विलास पाटील आणि सरदेशमुख यांच्यामध्ये जोरदार वाद होता. विलास पाटालांचा मुलगा रोहन सरदेशमुख यांना ढकलून दतो. या वादामध्ये विलास पाटील हे चांगलेच अडकतात. परंतु वडिलांचे सगळे आरोप त्यांची मुलगी माऊ स्वत:वर घेते. त्यानंतर मालिकेत एसीपी सिद्धांत भोसलेची एण्ट्री होते. तो या प्रकरणाचा तपास घेत असतो. दरम्यान त्याच्या हाती पुरावे लागतात आणि तो माऊ निर्दोषी असल्याचे सिद्ध करतो. तसेच रोहनला त्याने केलेल्या गुन्हाची शिक्षा देतो.
View this post on Instagram
एसीपा सिद्धांत भोसलेची भूमिका अभिनेता सिद्धार्थ खिरीदने साकारली आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीला उतर असल्याचे पाहायला मिळते. सिद्धार्थने जाडूबाई जोरात, एक होती राजकन्या, फ्रेशर्स अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 11:19 am