बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतच्या हेअर ड्रेसरला खार पोलिसांनी अटक केली आहे. ब्रॅडन आल्स्टर डिगी असे अटक करण्यात आलेल्या हेअर ड्रेसरचे नाव आहे. अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी खार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खार पोलिसांनी डिगी याला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे. सध्या डिगीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय ब्रॅडन आल्स्टर डिगी हा मुळचा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो क्वीन कंगनाचा हेअर ड्रेसर म्हणून काम पाहत होता. रायगड येथे कंगनाच्या आगामी चित्रपटाचे चित्रकरण सुरू होते. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवरच खार पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.