अभिनेत्री करिष्मा कपूरच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. करिष्माच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या पाकिटातून चोराने डेबिट कार्ड चोरले आणि त्यातून ४५ हजार रुपयांची किंमत काढली. सुतारकाम करण्याच्या बहाण्याने इम्तियाझ अन्सारी नावाच्या व्यक्तीने करिष्माच्या खारमधील निवासस्थानी प्रवेश मिळवला आणि तिथे चोरी केली. या सुताराला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माझी नसबंदी निसर्गही करु शकत नाही- धर्मेंद्र

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अन्सारीने करिष्माच्या घरात सुतार काम करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता. करिष्मा घरी नसल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलेने त्याला घरात घेतलं. त्या महिलेचे आपल्याकडे लक्ष नाही ही संधी साधून त्याने तिची पर्स पळवली आणि त्यातील डेबिट कार्ड घेतले.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अन्सारीची ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अन्सारीला २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्सारीने यापूर्वीही अनेकांच्या घरी सुतारकाम करण्याच्या निमित्ताने प्रवेश मिळवून चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहलाज निहलानींचा नवा नियम, आता रुपेरी पडदा ‘नो स्मोकिंग झोन’

कमी किमतीत काम करण्याचं आश्वासन देत तो घरात शिरतो. घरातील मौल्यवान वस्तू चोरुन कामाचे साहित्य आणण्याच्या बहाण्याने तो घरातून काढता पाय घेतो. अन्सारीच्या नावावर याआधीही १८ ठिकाणी चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. घरात एकट्या महिला आहेत असे घर तो चोरी करण्यासाठी निवडायचा. आतापर्यंत त्याने खार, वांद्रे, आंबोली, जुहू, बोरिवली, सांताक्रुझ, वर्सोवा, विलेपार्ले परिसरात चोऱ्या केल्या आहेत.