28 September 2020

News Flash

दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत मिळाल्याच्या वृत्तावर मुंबई पोलिसांनी केला खुलासा, म्हणाले…

दिशा सालियान आत्महत्या प्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबरोबरच त्याची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूवरूनही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ काही माध्यमांनी दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्याचं वृत्त दिल्यानं खळबळ उडाली. मात्र, या वृत्तानंतर मुंबई पोलिसांनी याविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्याची घटना आठ जून रोजी समोर आली होती. आत्महत्येनंतर ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावरून बऱ्याच शंका आणि आरोप केले जात आहे. अशात काही माध्यमांनी दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्याचं वृत्त दिलं होतं. हे वृत्त फेटाळून लावत मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.

“दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याची बातमी चुकीची आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी दिशाचे पालकही घटनास्थळी होते. दिशानं तिची मैत्रीण अंकिताला शेवटचा फोन केला होता, तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत २०-२५ लोकांची साक्ष नोंदवण्यात आली आहे,” अशी माहिती मुंबई झोन ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी ही माहिती दिली.

माध्यमांनी शवविच्छेदन अहवालानुसार वृत्त दिलं होतं की, दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार दिशा सालियाननं आत्महत्या करण्यापूर्वी जवळपास ४५ मिनिटं फोनवर बोलत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 6:50 pm

Web Title: mumbai police clarification on reports about disha salian body found naked bmh 90
Next Stories
1 सतीश शाह यांची करोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 ‘सेक्रेड गेम्समध्ये भूमिका मिळाली होती पण अनुरागने शेवटच्या क्षणी..’, विजय वर्माचा खुलासा
3 ‘काही लोकांना समजतच नाही की ते..’, मुलाखतीमध्ये संतापली बबिता
Just Now!
X