21 March 2019

News Flash

सलमानच्या जीवाला धोका कायम, ३ मारेकरी मुंबईत!- सूत्रांची माहिती

पोलिसांना संपतच्या मोबाईलमधून सलमानच्या गॅलेक्सी घराचे काही फोटोही सापडले

सलमान खान

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या जीवावरचा धोका अजूनही कमी झालेला नाही. सलमानला मारायला आलेला शार्पशूटर संपत नेहरा याला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. संपतच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली. राजू, अक्षय आणि अंकित हे त्याचे तीन साथिदार अजूनही मुंबईत मोकाट फिरत आहेत. या तिघांना अजून पकडण्यात आले नसल्यामुळे सलमानच्या जीवाला धोका अजूनही कायम आहे. यामुळेच मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राजू, अक्षय आणि अंकित या तिघांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. तिघांचा ठाव ठिकाणा मिळवण्याचे काम मुंबई पोलीस करत आहे. या तिघांना गजाआड करेपर्यंत सलमानच्या जीवाला धोका असेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूवी काळवीट शिकार प्रकरणाची जोधपूर न्यायालयात सुनावणी होत असताना, लॉरेन्स बिश्नोई या नावाने उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा लॉरेन्सच्या धमकीकडे लोकांनी फारसे लक्ष दिले नाही. पण ६ मे रोजी लॉरेन्सचा सहकारी संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून लॉरेन्सचा खुनाचा कट कळला. यामुळेच सलमानच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

salman khan सलमान खान

लॉरेन्सच्या सांगण्यावरुनच संपत मुंबईत आला होता. यासाठीत्याने रेकीही केली होती. पोलिसांना संपतच्या मोबाईलमधून सलमानच्या गॅलेक्सी घराचे काही फोटोही सापडले. च्या पहिल्या आठवड्यात संपत सलमानच्या मुंबई येथील घराच्या बाहेर रेकी करत होता. सलमान जेव्हा त्याच्या चाहत्यांना भेटायला घराबाहेर येतो तेव्हाचे काही फोटो संपतकडे सापडले. सलमानची बाल्कनी ते त्याचे अंतर मोजण्यासाठी संपतने फोटो काढले होते. सलमानची हत्या करण्यासाठी संपतला लवकरच हत्यार मिळणार होते.

गेल्या २० दिवसांपासून संपत नोकरीच्या शोधात असल्याचे सांगत एका फ्लॅटमध्ये राहत होता. सलमानची हत्या करुन परदेशात जाण्याचा त्याचा कट होता. लॉरेन्स बिश्नोई गँग राजस्थानमध्ये फार सक्रीय गँग आहे. स्वतः लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे. लॉरेन्सने सलमानला तुरूंगातच जीवे मारण्याची धमकी दिली होती.

First Published on June 14, 2018 1:15 pm

Web Title: mumbai police on high alert as the aides of gangster who wanted to kill salman khan are on the run