News Flash

सलमानच्या ‘राधे’च मीम शेअर करत मुंबई पोलिसांचं भन्नाट ट्वीट; “आय लव्ह इट”

"जेव्हा नागरिक बिना मास्क घराबाहेर निघतात"

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. एककीकडे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना होणारी ओढाताण, नागरिकांचं संरक्षण करतानाच करोनाचा धोका अशा अनेक समस्या असतानाही मुंबई पोलीसांमध्ये सकारात्मकता दिसून येतेय.

करोनाच्या काळात नागरिकांकडून सर्व नियमांच पालन होतयं का याकडे मुंबई पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. नुकतच मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नागरिकांसाठी एक मेसेज दिला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्यात रिलीज झालेल्या राधे सिनेमातील एका सीनचं मीम शेअर करत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या ट्विटमध्ये “जेव्हा नागरिक बिना मास्क घराबाहेर निघतात तेव्हा” असं म्हणत फोटो शेअर करण्यात आलाय.

ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणदीप हुड्डा चा एक डायलॉग आहे. ‘आय लव्ह इट’. रणदीप हुड्डाच्या चेहऱ्याच्या जागी करोनाच्या व्हायरलसचा फोटो लावून मुंबई पोलिसांनी तो शेअर केलाय. यावर ‘आय लव्ह इट’ लिहण्यात आलं. म्हणजेच दर कुणी बिना मास्क बाहेर पडलं तर करोनाला बळी पडू शकतो असं यातून दर्शवण्यात आलंय.

आणखी वाचा- ‘राधे’मधील नवे गाणे प्रदर्शित, सलमानचा अनोखा अंदाज चर्चेत

मुंबई पोलिसांच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांसह कलाकारांनीदेखईल प्रतिक्रिया दिल्या आहेत. या आधीदेखील अनेक वेळा मुंबई पोलिसांनी सिनेमाचे पोस्टर किंवा दृश्य शेअर करत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 11:50 am

Web Title: mumbai police share salman khans radhe meme on twitter goes viral kpw 89
Next Stories
1 ‘येणार तर मोदीच’, अनुपम खेर यांचे ट्वीट चर्चेत
2 Oscar 2021 : म्हणून ‘ऑस्कर’ विजेत्यांची नावं ठेवतात गोपनीय
3 ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नोमडलँड’चा बोलबाला, तीन पुरस्कारांवर कोरलं नाव
Just Now!
X