20 October 2020

News Flash

तनुश्री- नाना वाद : डेझी शाहची मुंबई पोलीस करणार चौकशी

प्रत्यक्षदर्शी म्हणून डेझीचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

तनुश्री- नाना वाद : डेझी शाहची मुंबई पोलीस करणार चौकशी

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादप्रकरणी आता मुंबई पोलीस अभिनेत्री डेझी शाहला समन्स बजावणार आहेत. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला. त्यावेळी सेटवर डेझी शाहसुद्धा उपस्थित असल्याचं तनुश्रीनं तिच्या जबाबात सांगितलं. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी म्हणून डेझीचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

डेझी शाह ही कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची असिस्टंट कोरिओग्राफर होती. गाण्याच्या सरावादरम्यान पाटेकर तनुश्रीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असताना डेझीने पाहिल्याचं तनुश्रीने जबाबात म्हटलं. मुंबई पोलीस लवकरच डेझीला समन्स बजावणार आहेत.

तनुश्रीने तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कोरिओग्राफर गणेश आचार्य, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माते सामी सिद्दीकी यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 8:00 pm

Web Title: mumbai police to summon daisy shah in tanushree dutta nana patekar harassment case
Next Stories
1 #MeToo अभिनेता पियुष मिश्रावर लैंगिक शोषणाचा आरोप
2 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास
3 #MeToo: आम्ही कधी भेटलोच नाही; सोना मोहपात्राच्या आरोपांवर अनू मलिक यांचं स्पष्टीकरण
Just Now!
X