News Flash

‘उत्सव २०१९’ – उत्सव पोलिसांच्या कौतुकाचा कलर्स मराठीवर

मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या कार्याचा उत्सव

‘उत्सव २०१९’ – उत्सव पोलिसांच्या कौतुकाचा कलर्स मराठीवर

लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने व कलर्स मराठी वाहिनी यांच्या सयुंक्त विद्यमाने लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘उत्सव २०१९’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम प्रेक्षकांना १७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे. मुंबापुरीच्या रक्षणासाठी पोलीस विभाग सदैव सतर्क असतो, मग ते लोहमार्ग पोलीस असो वा अन्य विभाग. कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी त्यांचे कटाक्षाने नियंत्रण असते. याच आपल्या लोहमार्ग मुंबई पोलीसांच्या सन्मानाखातर आणि हे सगळे पोलीस अधिकारी आपल्यासाठी करत असलेल्या मौल्यवान कार्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘उत्सव २०१९’ या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याचबरोबर सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, राहुल वैद्य, सेलिना जेटली या सेलिब्रिटींसुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे आणि प्रियदर्शन जाधव यांनी केले. कार्यक्रमात मानसी नाईक, स्मिता गोंदकर आणि बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे यांनी लावणी तसेच पिंगा या गाण्यावर मेघा धाडे आणि सई लोकूर देखील एकत्र नृत्य सादर केले. तसेच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. तसेच वैशाली माडे, आनंद शिंदे, राहुल वैद्य यांनी बहारदार गाणी सादर केली. राहुल वैद्य याच्या अप्रतिम गाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. भूषण कडू, नंदकिशोर चौघुले, माधवी जुयेकर यांच्या विनोदाने जमलेल्या सगळ्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडले तर वैशाली माडे हिच्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स मराठीवर १७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता बघायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2019 1:41 pm

Web Title: mumbai railway police event utsav 2019 on colors marathi
Next Stories
1 ‘बाहुबली’मधील ‘ही’ अभिनेत्री साकारणार पॉर्न स्टारची भूमिका
2 Video : ‘माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं’, वेडिंगचा शिनेमामधलं गाणं प्रदर्शित
3 ‘सिंघम’, ‘सिम्बा’नंतर आता रोहित शेट्टी आणणार ‘लेडी सिंघम’
Just Now!
X