29 September 2020

News Flash

Video..जान्हवीने असा घेतला पावसात भिजण्याचा आनंद

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी 'धडक' या चित्रपटातून प्रथमच चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणार आहे.

जान्हवी

गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं होतं.त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र या साऱ्या गडबडीच्या काळातही नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूने पावसात भिजण्याचा आनंद घेतल्याचं दिसून आलं.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी ‘धडक’ या चित्रपटातून प्रथमच चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होणार असून त्यापूर्वीच जान्हवीने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर केलेल्या प्रत्येक पोस्टकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष असतं. सध्या जान्हवी ‘धडक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून काही दिवसापूर्वीच तीने एका रेडिओ स्टेशनला भेट दिली. यादरम्यानच तीने पावसात भिजण्याचा आनंद घेतल्याचं दिसून आलं.

Haha Jannu and Ishaan loving the rain @janhvikapoor @ishaan95

A post shared by Janhvi Kapoor/ Khushi Kapoor (@janhvikhushixo) on

जान्हवी आणि इशानचा पावसात भिजणारा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून जान्हवी एखाद्या लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे. पावसापासून जान्हवीचे संरक्षण व्हावं यासाठी तिचे अंगरक्षक तिच्या डोक्यावर छत्री घेऊन उभे होते. मात्र जान्हवी-इशानने या छत्र्या झुगारुन रेडिओ स्टेशन गाठल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, ‘धडक’च्या प्रमोशनसाठीच रेडिओ स्टेशनवर पोहोचलेल्या जान्हवीने पावसाला बघताच देहभान विसरल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ‘धडक’च्या प्रमोशनसाठी इशान-जान्हवी प्रचंड मेहनत घेत असून हे दोघंही ऊन,वारा, पाऊस यांची पर्वा न करता प्रमोशनच्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:54 am

Web Title: mumbai rains janhvi kapoor enjoying rains
Next Stories
1 हार्दिक पांड्या ईशा गुप्ताला करतोय डेट?
2 ..म्हणून बिग बींचा राग झाला अनावर
3 ‘भारतात क्रिकेटइतकं महत्त्व अन्य खेळांना दिलं जात नाही ही शोकांतिकाच’
Just Now!
X