News Flash

‘मुंबई सागा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अयशस्वी, कमावले इतके कोटी

जाणून घ्या चित्रपटाच्या कमाई विषयी...

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनचा भरणा असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचण्यात अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. पण पुढच्या काही दिवसांमध्ये चित्रपट चांगली कमाई करु शकतो असे म्हटले जात आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत ‘मुंबई सागा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये किती कमाई केली आहे याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाने २.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ‘मुंबई सागा’ या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.

“‘मुंबई सागा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली नाही. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रामध्ये चित्रपटाने अधिक कमाई करणे अपेक्षित होते. पुढच्या दोन दिवसात चित्रपट अधिक कमाई करु शकतो. शुक्रवारी (प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी) चित्रपटाने २.८२ कोटी रुपये कमावले आहे” या आशयाचे ट्वीट तरण आदर्श यांनी केले आहे.

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ताने केले आहे. या चित्रपटात जॉन आणि इम्रानसोबत काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बरस रोनित रॉय, गुलशन ग्रोवर आणि अमोल गुप्ते हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे बजेट ६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट २१०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 2:40 pm

Web Title: mumbai saga first day box office collection avb 95
Next Stories
1 जेनेलियाने केली रितेशची धुलाई, व्हिडीओ शेअर करत प्रिती म्हणाली…
2 फिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल?
3 Birthday Special : अल्का याज्ञिकने आमिरला काढले होते खोलीबाहेर
Just Now!
X