News Flash

मुंबई सागा : अंडरवर्ल्डचे रहस्य उलगडणार तगडी स्टारकास्ट

हा चित्रपट हा चित्रपट १९८० ते १९९०च्या काळावर आधारित असेल.

मुंबई सागा

‘शूट आऊट अॅट वडाला’ , ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ यासारखे चित्रपट बनवण्यात हातखंडा असलेला निर्माते, दिग्दर्शक संजय गुप्ता लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत. गँगस्टर असणारे चित्रपट बनवण्यासाठी संजय गुप्ता प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वीच संजय गुप्ता यांनी या चित्रपटात जॉन अब्राहम व इम्रान हाश्मी एकत्र येणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव ‘मुंबई सागा’ असून हा चित्रपट हा चित्रपट १९८० ते १९९०च्या काळावर आधारित असेल. या चित्रपटासाठी जॉन व इम्रानचे चाहते खूप उत्सुक आहेत.

चित्रपटव्यापार विश्लेषक तरण आदर्शने केलेल्या ट्विटनुसार, ‘आता या चित्रपटात जॉन व इम्रानसोबत जॅकी श्रॉफ,सुनील शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, प्रतीक बब्बर, रोहित रॉय हे कलाकारही दिसणार आहेत. पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून, २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार व अनुराधा गुप्ता हे निर्माते आहेत.’ संजय गुप्ता यांना सिनेसृष्टीत येऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९४ साली त्यांनी ‘आतिश’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

१९८० ते १९९०चा काळ ‘बॉम्बे’ची ‘मुंबई’ होण्याचा, स्थित्यंतराचा हा काळ होता. या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. मिल्स बंद होणं, व्यावसायिकांचे खून, व्यवसाय, पोलीस, राजकारणी यांचे संबंध या सगळ्या घटना या चित्रपटात दिसतील. संजय गुप्ता म्हणाले की, “जॉनसोबत हा माझा तिसरा चित्रपट असून मी इम्रानसोबत काम करण्यासही खूप उत्सुक आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. पुन्हा एकदा ‘गँगस्टर’ नाट्य असलेला चित्रपट करताना घरी परत आल्यासारखं वाटतंय.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 12:48 pm

Web Title: mumbai saga taran aadarsh tweet sanjay gupta djj 97
Next Stories
1 ‘वेदनम’च्या रिमेकमध्ये दिसणार जॉन अब्राहम?
2 ‘झुंड’साठी असा जुळून आला बिग बी व नागराज मंजुळेंचा योग
3 Happy Birthday kirron Kher : …अन् सुरु झाली अनुपम- किरण यांची लव्हस्टोरी
Just Now!
X