News Flash

“मुंबईची सुकन्या” होऊ दे जल्लोष करूया गौरव स्त्री कौशल्याचा

सामान्य स्त्रीला रॅम्प वॉल्क करायला लावणारा एक आगळा वेगळा रियालिटी शो आहे.

लवकरच मी मराठी वाहिनीवर "मुंबईची सुकन्या" होऊ दे जल्लोष, करूया गौरव स्त्री कौशल्याचा या रियालिटी शोला सुरुवात होणार आहे.

लवकरच मी मराठी वाहिनीवर “मुंबईची सुकन्या” होऊ दे जल्लोष, करूया गौरव स्त्री कौशल्याचा या रियालिटी शोला सुरुवात होणार आहे. या आगामी रियालिटी शो चा प्रोमो प्रकाशनाचा सोहळा दादर येथील प्लाझा प्रिव्हिव्ह थेटर येथे नुकताच पार पडला. या वेळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद, मैथिली जावकर आणि आय स्पेशालिस्ट डॉ. चंद्रशेखर चव्हाण उपस्थिती होते.

स्त्री या शब्दाबरोबर प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या सर्व भावना असलेली शक्तीसंपन्न स्त्री डोळ्यासावर समोर उभी रहाते. अशा या उंच उंच भरारी घेणारी स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक मुलीला, बाईला, स्त्री ला स्वतःला मुंबई सारख्या सोनेरी स्वप्नांच्या नगरीत सिद्ध करण्यासाठी, स्वतःतील सकारात्मता, मौलिकता जगाला दाखवून देण्यासाठी, स्त्रियांच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘स्वप्नांना कधी अडचणी सांगू नका, तर अडचणींना सांगा आपली स्वप्न किती मोठी आहेत ते.’ हे धोरण घेऊन एलरिओ प्रोडक्शन्स प्रेसेंट्स इन असोसिएशन विथ ए.आर.क्रिएशन पॉव्हर्ड बाय सिलिंक प्रॉपर्टीज लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहेत “मुंबईची सुकन्या” होऊ दे जल्लोष करूया गौरव स्त्री कौशल्याचा.फक्त आपल्या लाडक्या ‘मी मराठी’ वाहिनीवर. डॉक्टर भरतेश्वर कस्तुरे आणि श्री. राम चिलगर निर्मित “मुंबईची सुकन्या” या रियालिटी शो चे दिग्दर्शन शिरीष राणे करत असून पूर्णिमा वाव्हळ – यादव या कार्यक्रमाचे होस्टिंग करणार आहे. त्याचप्रमाणे कॉश्च्युम डिझायनर ज्योती पगारे, प्रोजेक्ट हेड नितीन पगारे व प्रोग्रॅम आणि क्रिएटिव्ह हेड संचित यादव तर इव्हेंट मॅनेजमेंट इमर्जिंग इव्हेंट्सचे करण शार्दूल, अक्षय बोवलेकर व जेसन थॉमस दिग्दर्शन विभाग जुईली पारखी आणि सोशल मीडिया समीर गोरे यांनी केले आहे.

“मुंबईची सुकन्या” होऊ दे जल्लोष करूया गौरव स्त्री कौशल्याचा हा फक्त एखाद्या नृत्याचा, गाण्याचा किंवा अभिनयाचा रियालिटी शो नसून ह्या तिन्हीचा संगम असलेला त्याचप्रमाणे एखाद्या सामान्य स्त्रीला रॅम्प वॉल्क करायला लावणारा एक आगळा वेगळा रियालिटी शो आहे. १८ ते ३६ वयोगटातील प्रत्येक मुलीला, स्त्री ला ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्या कलागुणांना वाव देऊन स्वतःला सिद्ध करता येणार आहे. येत्या २२ जानेवारी २०१७ पासून मुंबई येथे ह्या शोची ऑडिशन राऊंड सुरु होणार असून, या रियालिटी शोमध्ये सहभाग घेण्यासाठी www.mumbaichisukanya.com वर एंट्री फॉर्म व इतर सर्व माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे.

कार्यक्रमांतर्गत उपस्थित असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद ह्या या कार्यक्रमाच्या फक्त प्रमुख पाहुण्या नसून “मुंबईची सुकन्या” या अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात निवडून आलेल्या कटेस्टन्टना त्या मार्गदर्शन करणार आहे याचा त्यांना फार आनंद वाटतो आहे.”मुंबईची सुकन्या” कार्यक्रमाबद्दल सांगताना त्या म्हणतात की, “मुंबईची सुकन्या” ही केवळ फक्त एक पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट नसून महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणारा त्याचबरोबर बेटी बचाओ, बेटी पढाओ याचा संदेश देणारा आजवर कधीही पाहण्यात न आलेला असा रियालिटी शो असणार आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 10:57 am

Web Title: mumbaichi sukanya hou de jallosh new marathi reality show
Next Stories
1 रोहिणीताईंनी कथकसाठी आयुष्य वेचले
2 रमेश आणि सीमा देव यांचे नृत्य आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद!
3 ट्रिपल एक्स रिव्ह्यूः विन डिझेलवर दीपिकाची मोहिनी
Just Now!
X