छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे. ‘तारक मेहता..’ची संपूर्ण टीम दमन वरून चित्रीकरण संपवून मुंबईला आल्यापासून बबीता उर्फ मुनमुन दत्ता एक ही दिवस मालिकेच्या सेटवर आली नाही. एवढंच नाही तर तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधान आलं होतं. आता मुनमुनने यावर एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुनमुनने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुनमुनने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडण्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या २-३ दिवसांपासून काही गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं आहे. यासगळ्याचा माझ्या आयुष्यावर वाईट परिणाम होतं आहे. लोक म्हणतं आहेत की मी मालिकेच्या सेटवर जातं नाही, हे खरं नाही. सध्या या शोमध्ये माझ्या उपस्थितीची गरज नाही. त्यामुळे मी सेटवर येत नाही,” असे मुनमुन म्हणाली.

पुढे मुनमुन म्हणाली, “या सगळ्या गोष्टी प्रोडक्शन हाऊस ठरवतं मी नाही. पुढची कहाणी काय असेल याचा निर्णय तेच घेतात. मी फक्त काम करते आणि माझं काम संपवून परत येते. त्यामुळे माझी गरज नाही तर मी नक्कीच सेटवर जाणार नाही.

आणखी वाचा : ‘मी घाबरलो होतो’; नागा चैतन्यने सांगितला समंथासोबतच्या पहिल्या ‘KISS’चा किस्सा

मालिका सोडण्यावर मुनमुन म्हणाली…

मुनमुन म्हणाली, “जर कधी तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला तर ती स्वत: या विषयी प्रेक्षकांना सांगेल. प्रेक्षक भावनिक दृष्ट्या तिच्या भूमिकेशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टी माहित असायला पाहिजे.” तर दुसरीकडे मालिकेचे निर्माते असीत मोदी यांनी मुनमुनने मालिका सोडली यावर प्रतिक्रिया देत सांगितले होते की या बद्दल मुनमुनने त्यांना काहीही सांगितलेले नाही.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुनमुनने जातिवाचक शब्द वापरला होता. त्यानंतर झालेल्या वादामुळे आता मेकर्सनी आता या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांकडून अंडरटेकिंग साईन करुन घेण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी त्यांनी मार्ग काढला आहे. त्यामुळे या मालिकेत काही दिवस तरी बबीताजींचं दर्शन घडणार नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munmun dutta reacts on reports of her quitting taarak mehta ka ooltah chashmah dcp
First published on: 27-07-2021 at 11:57 IST