News Flash

हे कधी झालं? ‘मुन्ना भाई MBBS’मधील सर्किटने कॉलेजच्या नर्सशीच केले होते लग्न?

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी फार गाजली होती.

अर्शद वारसीने सर्किट ही व्यक्तीरेखा साकारली होती.

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे आतापर्यंत प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचे नाव आवर्जुन घेतले जाते. या चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी फार गाजली होती. मुन्नाभाई ही भूमिका संजय दत्तने साकारली होती तर सर्किट ही भूमिका अर्शद वारसीने साकारली होती. अर्शदचे ‘सर्किट’ हे पात्र त्यावेळी विशेष गाजले होते. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या शेवटी सर्किटचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण आज इतक्या वर्षांनंतर नेटकऱ्यांच्या लक्षात आले की सर्किटने जिच्यासोबत लग्न केले ती दुसरी तिसरी कोणी नसून चक्क मुन्नाभाई शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमधील नर्स आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रटाच्या शेवटी मुन्नाभाई हा डॉक्टर सुमन म्हणजे अभिनेत्री ग्रेसी सिंहशी लग्न करताना दिसतो. तसेच सर्किटचे देखील लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण ते कोणाशी झाले हे फार कमी लोकांना माहिती आहे. सर्किटने लग्न केले असून त्याला एक मुलगा असल्याचे दाखवण्यात आले होते. सर्किटने मुन्नाभाई शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमधील एका नर्सशी लग्न केल्याचे नेटकऱ्यांनी शोधून काढले आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

आणखी वाचा : …त्या नकारानंतर रेखा मुंबईतील रस्त्यावर रडत आणि अनवाणी फिरत होत्या

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | culture | comedy (@ghantaa)

सध्या सोशल मीडियावर सर्किटचा नर्स आणि मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या नर्सचा फोटो देखील आहे. या फोटोवर ‘मुन्नाभाई चित्रपटातील सर्किटने नर्सशी लग्न केले हे कळायला तुम्हाला किती वर्षे लागली?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. एका यूजरने ‘आता भाईने डॉक्टरशी लग्न केले तर सर्किटने नर्सशी लग्न करायला नको का’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आम्हाला सर्किटवर चित्रपट हवा आहे. MCU- मुन्नाभाई सिनेमॅटीक यूनिव्हर्स’ असे म्हटले आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अर्शद वारसीने सर्किट ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. दरम्यान, संजय दत्त आणि अर्शदची जोडीही सर्वांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्रच आहेत. आता चाहते मुन्नाभाई एमबीबीएसच्या तिसऱ्या भागाची वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये अर्शदने तिसऱ्या भागाविषयी माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 11:30 am

Web Title: munna bhai mbbs fans are surprised to find out that circuit married a medical college nurse avb 95
Next Stories
1 “राजा हिंदुस्तानीमधील किसिंग सीन देताना मी थरथरत होते”,करिश्माने केला होता खुलासा
2 द फॅमिली मॅन 2 : ‘समांथाने दिलेले ते इंटिमेट सीन्स नंतर डिलीट करण्यात आले’
3 भरदिवसा अभिनेत्याच्या कारमधून झाली चोरी
Just Now!
X