20 January 2018

News Flash

VIDEO : ‘मुन्ना मायकल’चे डिंग डँग’ गाणे

हा सिनेमा म्हणजे फक्त नृत्यावरच नसून अॅक्शनचा परिपूर्ण तडकाही यात दिसणार आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 6:24 PM

मुन्ना मायकल सिनेमाचे नवे गाणे प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा मुन्ना मायकलचे नवे गाणे ‘डिंग डँग’ सोमवारी प्रदर्शित करण्यात आले. गाण्याच्या प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान, टायगर आणि अभिनेत्री निधी अग्रवालने मुंबईतील बसवर चढून डान्सदेखील केला. हे एक पार्टी साँग आहे. या गाण्यात टायगर जे करण्यात माहिर आहे ते सर्व करताना दिसतो. म्हणजे तो उत्तम डान्स तर करतोच शिवाय त्याच्या काही ठरलेल्या मुव्ह आहेत, ज्या त्याच्या प्रत्येक सिनेमात दिसतात, त्याप्रमाणे त्या स्टेप्स याही सिनेमात दिसतात.

आमिर, आलिया, धनुष, ज्युनिअर एनटीआरला संकरभारनम पुरस्कार जाहीर

फक्त इरॉस एण्टरटेनमेन्टच्या युट्यूब चॅनलवरून हा २ मिनिटं ३३ सेकंदाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी टायगर फाइट सीन करताना दिसतो. सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, मुन्ना ही व्यक्तिरेखा साकारणारा टायगर हा मायकल जॅक्सनचा फार मोठा चाहता असतो. आपल्या स्वप्नांच्या मागे जाताना मुन्नाचा ‘मुन्ना मायकल’ कसा होतो हे सांगणारा हा सिनेमा आहे. निधी त्याच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला मदत करते. तर दुसरीकडे नवाज एका कुख्यात गुंडाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. पण त्याला नृत्यात आपले नाव कमवायचे असते म्हणून तो मुन्नाकडे नृत्य शिकायला येतो. हा सिनेमा म्हणजे फक्त नृत्यावरच नसून अॅक्शनचा परिपूर्ण तडकाही यात दिसणार आहे. शब्बीर खान दिग्दर्शित मुन्ना मायकल हा सिनेमा येत्या २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’चे नवे पोस्टर प्रदर्शित

हे गाणं प्रदर्शित होण्यापूर्वी गाण्याचा टीझर पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाचे मुख्य आकर्षण असेल ते म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीचा डान्स. नवाज पहिल्यांदा या सिनेमात डान्स करताना दिसणार आहे. त्याच्या अभिनयाचे तर लाखो चाहते आहेत पण आता तो डान्सही तेवढ्याच तोडीचा करतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. टायगरसोबत काम करणाऱ्या निधीचा हा पहिला सिनेमा आहे. ट्रेलरमधील तिचा अभिनय पाहून सध्या सिनेवर्तुळात तिच्याच नावाची चर्चा होताना दिसते.

First Published on June 19, 2017 6:23 pm

Web Title: munna michael party song ding dang release tiger shroff and nidhi agrawal dancing on streets
  1. No Comments.