06 July 2020

News Flash

‘गणवेश’ अल्बमसाठी नव्या गीतकाराचा शोध

जानेवारी महिन्यात नव्याने प्रकाशित होणाऱ्या ‘गणवेश’ या गाण्यांच्या अल्बमसाठी ‘गणवेश’ या विषयावरच काव्य मागविण्यात आले आहे.

| November 26, 2014 06:40 am

जानेवारी महिन्यात नव्याने प्रकाशित होणाऱ्या ‘गणवेश’ या गाण्यांच्या अल्बमसाठी ‘गणवेश’ या विषयावरच काव्य मागविण्यात आले आहे. रसिकांनी पाठविलेल्या कवितांमधून सवरेत्कृष्ट सहा गाण्यांची निवड केली जाणार असून त्यांचा आल्बममध्ये समावेश करण्यात येणार आहे.
शालेय जीवनापासून सुरू झालेल्या गणवेश प्रवासाबाबतच्या आठवणींना काव्यात गुंफण्यासाठी नव्या गीतकारांचा शोध घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी रोजी आल्बमचे प्रकाशन केले जाणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेते आणि कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री मुक्ता बर्वे हे गीतांची निवड करणार आहेत.
संगीतकार निहार शेंबेकर व अतुल जगदाळे यांची संकल्पना असलेल्या या अल्बमसाठी काव्य पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असून vijayateentertainments@gmail.com या मेल आयडीवर काव्य पाठवायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 6:40 am

Web Title: music album
टॅग Entertainment
Next Stories
1 मराठी माणसांनी आपले ‘मराठी’पण जपावे -आशा भोसले
2 ‘स्वच्छ भारत’ अभियानातील प्रियांकाच्या योगदानाचे पंतप्रधानांनकडून कौतुक
3 पाहाः ‘वेलकम बॅक’मधील वराती जॉन, अनिल कपूर आणि नाना पाटेकर
Just Now!
X