News Flash

…म्हणून सुमेध संस्कृतीला म्हणतो, ‘बेखबर कशी तू’

अभिनेता सुमेध मुदगलकरने संस्कृतीसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नुकतंच पदार्पण केलेला नवोदित अभिनेता सुमेध मुदगलकर आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहेत. या अल्बमची निर्मिती समीर परब आणि संतोष परब यांनी केली असून दिग्दर्शन ओमकार माने,जयपाल वाधवानी यांनी केली आहे.

‘बेखबर कशी तू’ असं या म्युझिक अल्बमच नाव असून तो १८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे बोल गीतकार आशिष देशमुख आणि व्यान यांनी लिहीले असून व्यान यांनीच संगीतबद्ध केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याला रॉकस्टर रोहित राऊतचा आवाज लाभला आहे.

दरम्यान, या म्युझिक अल्बमचं डेहराडून, हृषिकेश या सारख्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलं आहे. ‘या म्युझिक अल्बमला प्रस्तुत करताना मला फार आनंद होत आहे. यापूर्वी कधीही अनुभूती न घेतलेली व्हिज्युअल ट्रिट, लोकेशन्स, कॉस्च्युम्स तुम्हांला या अल्बमच्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्यामुळे हा अल्बम प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे’, असं ‘व्हिडियो पॅलेस’चे नानुभाई जयसिंघानी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 7:18 pm

Web Title: music album sumedha sanskruti balgude will be seen together
Next Stories
1 अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याची शाहरुखला खंत, म्हणाला…
2 गुरु ग्रंथ साहिब अपमान प्रकरण: अक्षय म्हणतो सगळे आरोप बिनबुडाचे
3 ‘झिरो’ वाद : शाहरुख खानविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका
Just Now!
X