News Flash

गँग्स ऑफ वासेपूरची संगीतकार स्नेहा खानवलकर अडकली विवाहबंधनात

ओय लक्की, लक्की ओय या चित्रपटाच्या सेटवर २००८ या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

ओय लक्की! लक्की ओय! चित्रपटातील जुगनी आणि गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील ओ वुमनिया या गाण्याने लोकप्रिय झालेली संगीतकार स्नेहा खानवलकर ही विवाह बंधनात अडकली आहे. (छायाचित्र: अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या फेसबुकवरून)

ओय लक्की! लक्की ओय! चित्रपटातील जुगनी आणि गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील ओ वुमनिया या गाण्याने लोकप्रिय झालेली संगीतकार स्नेहा खानवलकर ही विवाह बंधनात अडकली आहे. चित्रपट दिग्दर्शक कनु बहलबरोबर ती विवाहाच्या बोहल्यावर चढली आहे. इंदूर येथे मराठी रितीरिवाजाप्रमाणे बुधवारी (दि. २३) हा विवाह सोहळा पार पडला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता सुभाषने स्नेहा आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दिबाकर बॅनर्जीच्या ओय लक्की, लक्की ओय या चित्रपटाच्या सेटवर २००८ या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. स्नेहा या चित्रपटाची संगीत दिग्दर्शक होती तर कनु हा सहायक दिग्दर्शक होता.

लग्नानंतर या जोडगळीने सांयकाळी नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसाठी रिस्पेशनचे आयोजन केले होते. जेवणावळीतही महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. सोबतीला इंदूरमधील विशेष डिश आणि काँटिनेन्टल पदार्थांचाही समावेश होता.

येत्या २७ जानेवारी रोजी स्नेहा आणि कनुने दिल्लीत आणखी एका स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. त्यानंतर ते फ्रान्सला रवाना होणार आहेत. तेथील चित्रपट महोत्सवात कनुच्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 4:25 pm

Web Title: music composer sneha khanwalkar married with director kanu bahl
Next Stories
1 उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’
2 Luka Chuppi Trailer : लग्नाआधी कार्तिक-कृतीची ‘लुका छुप्पी’
3 ‘…हीच त्यांची संस्कृती’, पानसेंना पाठींबा देत खोपकरांचा शिवसेनेला टोला
Just Now!
X