News Flash

‘कोणालाही न सांगता तिने…’, साजिदच्या पत्नीनेच वाजिदला केली होती किडनी दान

नुकत्याच एका शोमध्ये साजिदची पत्नी आणि आईने हजेरी लावली तेव्हा हा खुलासा केला.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय संगीत दिग्दर्शक म्हणून साजिद-वाजिद ही जोडी ओळखली जात होती. पण काही महिन्यांपूर्वी वाजिद खानचे निधन झाले. अनेकदा साजिद खान भाऊ वाजिदच्या आठवणीमध्ये भावूक झाल्याचे दिसते. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात साजिदने मोठा खुलासा केला आहे.

साजिदने नुकताच छोट्या पडद्यावरील ‘इंडियन प्रो म्यूझिक लीग’ या कार्यमक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान त्याने माझा भाऊ वाजिद याची एक किडनी खराब झाली होती. तेव्हा माझी पत्नी लुबनाने तिची किडनी वाजिदला दिली होती. त्यावेळी मी आणि माझी मुले घाबरलो होतो असे म्हटले.

आणखी वाचा : ‘थर्ड क्लास अभिनय…’, द बिग बुल प्रदर्शित होताच अभिषेक बच्चन झाला ट्रोल

‘इंडियन प्रो म्यूझिक लीग’च्या एका विशेष भागात साजिद खानसोबत त्याची पत्नी लुबना आणि आई रजिना दोघींनीही हजेरी लावली होती. दरम्यान रजिना यांनी सांगितले की वाजिदला किडनीची गरज होती. पण त्यांना मधुमेह असल्यामुळे त्यांची किडनी देता आली नाही. आम्ही प्रयत्न करत होतो की वाजिदला लवकरात लवकर किडनी मिळावी. अनेकांनी आमच्या या कठिण काळाचा फायदा घेतला. तेव्हा साजिदची पत्नी लुबनाने वाजिदला किडनी देण्याचा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या.

‘कुटुंबातील सर्वांनी वाजिदला किडनी देण्यास नकार दिला होता. पण लुबनाने कोणालाही न सांगता जाऊन तिच्या सर्व टेस्ट केल्या आणि नंतर किडनी मॅच झाल्याने वाजिदला देण्याचा निर्णय घेतला. आजकाल आई-वडील देखील मुलांना किडनी देत नाहीत. पण लुबनाने कोणताही विचार न करता किडनी देण्याचा विचार केला होता’ असे साजिद-वाजिदची आई रजिना यांनी सांगितले.

१ जून २०२० रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी वाजिद खानचे निधन झाले. किडनीच्या समस्येमुळे त्याचे निधन झाल्याचे समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 1:52 pm

Web Title: music director sajid khan wife lubna secretly donated her kidney to wajid khan avb 95
Next Stories
1 “डोहाळे पुरवा…सखीचे डोहाळे पुरवा!”, श्रेया घोषालला डोहाळेजेवणाचं ‘हे’ खास सरप्राईझ!
2 विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचा पुढाकार; व्हिडिओ शेअर करत म्हणाला,”…”
3 Chupke Chupke: ‘जलसा’ हे घर कसं झालं? अमिताभ यांनी सांगितली ४६ वर्षांपूर्वीची गोष्ट
Just Now!
X