News Flash

बनावट आधार कार्ड दाखवून अभिनेत्रीच्या घरी चोरी

'त्यांनी अंतर्वस्त्रेही चोरायची नाही सोडली'

मेघना नायडू

‘कालियों का चमन जब खिलता है’ फेम अभिनेत्री मेघना नायडू सोबत एक अजब प्रकार घडला आहे. मेघनाचा गोव्यातील घरी जोडपे असल्याचा दिखावा करून राहणाऱ्या दोघांनी तिला गंडा घातला आहे. बनावट आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून त्या दोघांनीही तिच्या घरातील सर्व वस्तू चोरल्या. त्यांनी घरात असलेली अंतर्वस्त्रे आणि पायमोजेसुद्धा सोडले नाहीत.

मेघनाने एका फेसबुक पोस्टद्वारे याविषयीची माहिती दिली. तिच्या घरी राहण्यासाठी आलेल्या त्या लोकांनी तिला भाड्याचे पैसे दिले नाहीतच. उलटपक्षी तिच्या घराच्या केअरटेकर महिलेकडून आणि तिथल्या शेजाऱ्यांकडूनच त्यांनी पैसे घेतले होते.

‘माझे गोव्यातील घराच्या केअरटेकर महिलेने त्यांना ते घर भाड्याने दिले. त्यावेळी त्यांनी आम्ही न्यूझीलंड मध्ये काम करत असून, मूळचे मुंबईचे आहोत असं सांगितलं. त्यांनी पुरावा म्हणून आधार कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स आम्हाला दिलं. पण ते सर्व बनावट असल्याचं तपासादरम्यान स्पष्ट झालं. एका रात्रीतच ते दोघेही पसार झाले. त्यांनी घरातलं सर्व सामान चोरलं होतं. छोट्या स्पीकरपासून तिथे असलेल्या अंतर्वस्त्रांपर्यंत सर्व गोष्टी त्यांनी लंपास केल्या’, असं तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं.

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

मेघानाने ही पोस्ट तिचा मित्र-मैत्रिणींनाही शेअर करायला सांगितली. जेणेकरून त्या चोरट्यांना पकडता येणं शक्यं होईल. चोरीचा हा नवीन प्रकार समोर आल्यामुळे सध्या गोवा परिसरात सावधगिरी बाळगण्यात येत आहे. चोरट्यांनी मेघनाच्या घरातील शोभेच्या मुर्त्या आणि काही वस्तूंची तोडफोड केल्याचंही कळत आहे. त्याशिवाय त्या दोघांनी केअर टेकर महिलेकडून ८५ हजार रुपये उकळले असून तिचा मुलाला कामासाठी परदेशात नेण्याचं आमिषही दाखवलं. त्याशिवाय आणखी एका महिलेला त्यांनी चाळीस हजारांचा गंडा घातला असून तिथल्या एका व्यक्तीकडून त्याचा जमिनीच्या कागदपत्रांची बनावट प्रतही घेतली आणि ते पसार झाले. गोव्याचा कँडोलिम भागात हा सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकरणी आता तपास सुरु असून मेघनाने सर्वांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 9:01 am

Web Title: music video kaliyon ka chaman fame actress megna naidus tenants dupe her after faking identity proofs of fake aadhar cards
Next Stories
1 फ्लॅशबॅक : ‘बटवारा’ आणि जे. पी. दत्ताची खासियत…
2 Blackmail Movie Trailer: गुंतागुंतीचा ‘ब्लॅकमेल’
3 स्वॅग- जॅझच्या तालावर थिरकणार पुणे!
Just Now!
X