‘स्टुडिओ नाइन एन्टरटेंटमेंट’तर्फे सादर होणाऱ्या आगामी ‘जलसा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार आहे. मराठी चित्रपटात निळू फुले यांनी साकारलेला ‘खलनायक’ व त्यांचे ‘बाई वाडय़ावर या’ हे वाक्य गाजले. हेच शब्द वापरून या चित्रपटात एक आयटम साँग तयार करण्यात आले आहे. आशुतोष राज यांच्या गाण्याला समीर साप्तीस्कर यांनी संगीतबद्ध केले असून हे गाणे अभिनेत्री मानसी नाईक यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. आनंद शिंदे यांनी गायलेल्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन राजेश बिडवे यांचे आहे.
‘पाणी वाचवा’ मोहीम
सामाजिक जाणीव आणि कर्तव्याचे भान जपत मनोरंजन विश्वातील ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने एक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या वाहिनीने ‘पाणी वाचवा महाराष्ट्र घडवा’ या मोहिमेंतर्गत ‘महाराष्ट्र देशा’ हे खास गाणे तयार केले आहे. ‘स्टार प्रवाह’चे लोकप्रिय कलाकार काळाची गरज ओळखून काय करायला पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचविणार आहेत. गाण्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सद्य:परिस्थितीवर भाष्य करण्यात आले असून उत्तरार्धात काय उपाययोजना करता येतील, त्याची माहिती सांगितली आहे. ‘यूटय़ूब’वर हे गाणे पाहता येणार आहे.
‘वजनदार’ मराठी चित्रपट
विधी कासलीवाल यांची निर्मिती असलेल्या ‘लॅण्डमार्क फिल्म्स’च्या ‘ वजनदार’ या आगामी चित्रपटात एक वेगळा विषय दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सादर केला आहे. चित्रपटात सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस हे कलाकार आहेत.
‘लाइफ का रिचार्ज’
‘अ‍ॅण्ड टीव्ही’ वाहिनीवर सोमवार, १३ जूनपासून ‘लाइफ का रिचार्ज’ हा कार्यक्रम सुरु होत आहे. ‘वाहेगुरू प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे प्रसारण दर सोमवार ते शुक्रवारी रात्री अकरा वाजता होणार आहे. याचे सूत्रसंचालन विकल्प मेहता व मिंटू शर्मा यांचे आहे. ज्योती राणा, ओमप्रकाश डिमरी, आधार गोस्वामी, नेहा शर्मा हे कलाकार यात आहेत. दैनंदिन जीवनातील घडामोडींवर या कार्यक्रमात छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून भाष्य करण्यात येणार आहे.

जागतिक शीळ स्पर्धेत मुंबईतील कलाकार
मुंबई : भारतीय संस्कृतीत शीळ वाजवणे दुय्यम आणि शीळ घालणारा छपरी. मात्र जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जो गेली ४८ वर्षे शीळ घालण्याची स्पर्धा आयोजित करत आहे यावर्षी पहिल्यांदाच भारतातून सातजणांची ‘वर्ल्ड व्हिसलर कन्वेन्शन’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या १५ जून रोजी जपानमध्ये या स्पर्धेचा प्रारंभ होणार असून यासाठी वेगवेगळ्या देशातील व्हिसलर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुंबईत ‘इंडियन व्हिसलर असोसिएशन’ संस्था गेली १२ ते १३ वर्षे काम करीत आहे. शीळ वाजवताना संगीताचे चढउतार स्पष्ट येण्यासाठी योगासने, धावणे यांसारखे व्यायाम करावे लागतात.
यासाठी खूप सराव करण्याची गरज आहे, असे ‘व्हिसलर परिषदे’साठी निवड झालेल्या निखिल राणे याने सांगितले. मुंबईतून ऋग्वेद देशपांडे, राजेश गायकवाड, सुरेंद्र प्रधान, अपर्णा नाईक, विद्या माधवन, निखिल राणे हे कलाकार सहभागी होणार आहेत.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…