News Flash

संगीतकार लक्ष्मण कालवश

नागपूर, मुंबई : दादा कोंडके यांच्या चित्रपटांतील शृंगारगीतांपासून हिंदी चित्रविश्वात कौटुंबिक आशयाची दर्जेदार आणि लोकप्रिय गीते रचणाऱ्या संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण तथा विजय पाटील यांचे

नागपूर, मुंबई : दादा कोंडके यांच्या चित्रपटांतील शृंगारगीतांपासून हिंदी चित्रविश्वात कौटुंबिक आशयाची दर्जेदार आणि लोकप्रिय गीते रचणाऱ्या संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण तथा विजय पाटील यांचे शनिवारी सकाळी नागपूर येथे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सून, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे. येथील फ्रेण्ड्स कॉलनी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळचे नागपूरकर असलेले विजय पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अर्धांगवायूच्या आजाराने ग्रस्त होते. गेल्या वर्षभरापासून ते मुलांकडे राहायला होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली आणि पहाटे निधन झाले. सुरेंद्र हेंद्रे तथा राम आणि विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण या संगीतकार जोडीने अनेक लोकप्रिय गीते चित्रपटसृष्टीला दिली. राजश्री फिल्मसचा ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. १९७६ साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यूनंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यंत त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले.  हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

कारकीर्दीला बहर…

राम लक्ष्मण रुढार्थाने कोणत्याही कं पूशी जोडलेले नसले तरी त्यांची नाळ जुळली ती राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांशी. ‘एजंट विनोद’ या ताराचंद बडजात्या यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे संगीत राम लक्ष्मण यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी इतरही हिंदी-मराठी चित्रपटांना संगीत दिले. मात्र एक तप उलटून गेल्यानंतर त्यांना संगीतकार म्हणून लोकप्रियता मिळाली. सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैने प्यार किया’ हा प्रेमपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाच्या गाण्यांनी त्याकाळी अबालवृध्दांना वेड लावले. उडत्या चाली किं वा ठेका, सहज ओठावर रुळणाऱ्या संगीताचा प्रवाह राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांबरोबर अधिक बहरला. त्यांच्यासाठी राजश्री प्रॉडक्शनच्या कार्यालयात एक खास खोली देण्यात आली होती.

हम आपके है कौनचा चमत्कार…

‘पत्थर के  फु ल’, ‘हंड्रेड डेज’, ‘अनमोल’, ‘प्यार का तराना’, महेश भट्ट दिग्दर्शित ‘सातवाँ आसमान’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. या चित्रपटांमधलीही त्यांची काही गाणी गाजली. पण एकाच चित्रपटातील सगळी गाणी गाजण्याचा चमत्कार त्यांनी पुन्हा १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके  है कौन’ या चित्रपटातून करून दाखवला.

लोकप्रिय गाणी…

‘अंजनीच्या सुता’, ‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘गब्बर सिंह यह क ह के  गया’, ‘तुम क्या मिले जाने जा’, ‘सुन बेलिया’, ‘मैय्या यशोदा’.  २०१८ मध्ये त्यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 1:31 am

Web Title: musician laxman passed away akp 94
Next Stories
1 ‘यशाकडे नेणारा प्रवास महत्त्वाचा’
2 ‘कं डोम’ पाठोपाठ आता ‘हेल्मेट’…
3 नाट्य परिषदेपुढे नाना समस्या
Just Now!
X