News Flash

सलीम-सुलेमानचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे.

सलीम-सुलेमान

सध्या पाहायला गेलं तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टीचे वेध लागले आहेत.अनेक बॉलिवूड कलाकारांनी मराठी चित्रपटांमध्ये पदार्पणही केलं आहे. विशेष म्हणजे आता याच कालाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीतकार सलीम-सुलेमान ही जोडीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

आजवर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदी चित्रपटसृष्टीतील सलीम-सुलेमान ही संगीतकार जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण करणार आहे.

गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. ‘चक दे इंडिया’, ‘अब तक छप्पन’, दोस्ताना’, ‘धूम २’ , ‘फॅशन’ , ‘सिंग इज किंग’ ‘मुझसे शादी करोगी’, ‘आजा नचले’ ‘इक्बाल’, ‘हम तुम’ या सारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटातील सलीम- सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले आहे. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत.

‘प्रवास’ चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकोर्डिंग नुकतंच संपन्न झाले आहे.

‘मराठी चित्रपटसृष्टीतील हा आमचा पहिलाच अनुभव होता. विशेष म्हणजे हा अनुभव खूपच वेगळा होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे’, असं सलीम- सुलेमानने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 12:55 pm

Web Title: musician salim sulaimans entry in marathi movie
Next Stories
1 Loveyatri box office collection : सलमानच्या १६० कोटींच्या अपेक्षेवर मेहुण्याने फेरले पाणी
2 #MeToo मोहिमेविषयी ऐश्वर्या राय -बच्चन म्हणते…
3 माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न; विकास बहलचा आरोप
Just Now!
X