News Flash

संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनामुळे निधन

उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

नव्वदच्या दशकात आपल्या सुमधूर संगीताने एका पिढीला प्रभावित करणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री करोनाने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्रवण यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. करोनावरील उपचारासाठी त्यांना माहीम येथील एल. एस. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांनाही संसर्ग झाला होता. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील संगीताने नदीम-श्रवण यांना हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवून दिली. प्रसिद्ध गायक कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक या तिघांचा आवाज आणि नदीम-श्रवण यांचे संगीत हे समीकरण कमालीचे लोकप्रिय ठरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 11:35 pm

Web Title: musician shravankumar rathore passed away abn 97
Next Stories
1 करोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांवर लवकरच मराठी चित्रपट; पोस्टर आलं समोर
2 “अल्लू अर्जुनची सगळीकडे हवा”; सलमान खानने गाणं कॉपी केल्याने चाहते नाराज
3 ‘दयाबेन’ हॉलिवूड चित्रपटामध्ये? पाहा मजेशीर व्हिडीओ
Just Now!
X