News Flash

वादक शिवमणी दुसऱ्या लग्नासाठी सज्ज

प्रसिद्ध वादक शिवमणी गझल गायक रुना रिझवीशी १० नोव्हेंबर रोजी एका खासगी सोहळ्यात विवाहबद्ध होत आहे. रुना आपल्या आयुष्यातील संगीत...

| November 4, 2014 02:58 am

प्रसिद्ध वादक शिवमणी गझल गायक रुना रिझवीशी १० नोव्हेंबर रोजी एका खासगी सोहळ्यात विवाहबद्ध होत आहे. रुना आपल्या आयुष्यातील संगीत असून, पहिल्या भेटीतच आपण रुनाच्या प्रेमात पडल्याची कबुली देत, मुंबईत एका छोटेखानी समारंभात आपण रुनाशी लग्न करणार असल्याची माहिती शिवमणीने वृत्तसंस्थेला दिली. भारताचा हा प्रसिद्ध वादक त्याच्या प्रायोगिक संगीतासाठी ओळखला जातो. ‘एशिया इलेक्ट्रिक’ नावाचा त्याचा स्वत:चा बॅण्ड असून, अलिकडेच ‘अरिमा नांबी’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्याने संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. रुनाने ‘यारो यार आयवल’ चित्रपटातील गाणी गायली आहेत. शिवमणी आणि त्याची पहिली पत्नी क्रशानी यांचा घटस्फोट झाला असून, त्यांना दोन मुलेदेखील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2014 2:58 am

Web Title: musician sivamani set for second marriage
Next Stories
1 अमिताभ बच्चन ‘पिकू’च्या चित्रीकरणात व्यस्त
2 बिग बॉस ८ : करिश्मा तन्नाने दाखविले तिचे खरे रंग
3 आराध्याच्या वाढदिवसासाठी ऐश्वर्याची जोरदार तयारी
Just Now!
X