News Flash

‘एक थी बेगम’मधून उलगडणार अश्रफ भाटकरचा प्रवास?

कोण आहे सपना?

सध्याचा काळ हा वेबसीरिजचा असल्याचं म्हटलं जातं. वेबसीरिजच्या माध्यमातून कोणताही विषय अगदी सहज-सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे सध्या वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल जास्त आहे. विशेष म्हणजे नेटफ्लिक्स, अँमेझॉन प्राईम, ‘एमएक्स प्लेअर’ अशा कितीतरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार वेबसीरिज उपलब्ध आहेत. यामध्येच बऱ्याच वेळा ‘एमएक्स प्लेअर’ दर्जेदार वेबसीरिज असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे लवकरच एमएक्स प्लेअरवर ‘एक थी बेगम’ ही नवीन सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सीरिजचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

‘एक थी बेगम’ ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे. खरं तर ही चर्चा रंगण्यामागेदेखील एक खास कारण आहे. या सीरिजच्या माध्यमातून अश्रफ भाटकर अर्थात सपनाची कथा उलगडण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘सपना’ हे नाव अनेकांच्या परिचयाचं असेल. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जीव घेण्याचं स्वप्न ज्या महिलेने उराशी बाळगलं ती महिला म्हणजे सपना.  या सीरिजची कथा सत्यघटनेपासून प्रेरित असून प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरुन या सीरिजमध्ये अभिनेत्री अनुजा साठे, सपनाची भूमिका साकारत असल्याचं दिसून येतं आहे.

दरम्यान, दाऊद इब्राहिमसाठी काम करणाऱ्या त्याच्या जवळच्या व्यक्तीसोबत सपनाचं लग्न झालं होतं. मात्र त्याच्या निधनानंतर सपना स्वत: गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय झाली. त्यानंतर अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तिने दाऊदला मारण्याचं स्वप्न पाहिलं. विशेष म्हणजे सपना सपनावर आधारित चित्रपटाची निर्मिती व्हावी यासाठी अनेक दिग्दर्शकांनी प्रयत्न केलं. काही वर्षांपूर्वी विशाल भारद्वाज “सपना ” या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि इरफान खान मुख्य भूमिकेत झळकणार होते. मात्र त्याच काळात इरफान कर्करोगावर उपचार घेत होता. त्यामुळे या चित्रपटाची निर्मिती अर्ध्यावरच राहिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 4:08 pm

Web Title: mxplayer new webseries sapna actress anuja sathe lead role ssj 93
Next Stories
1 ‘खिचडी’ आणि ‘साराभाई’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे
2 ..जेव्हा सलमानने जाळला होता वडिलांचा पगार
3 ‘बी-ग्रेड अभिनेत्री’ म्हणत रंगोलीचा तापसीला टोला
Just Now!
X