News Flash

“माझा नवा अल्बम म्हणजे माझ्या पत्नीला लिहिलेली प्रेमपत्रं”- निक जोनास

पत्नी प्रियांका चोप्राच्या आठवणीत निक जोनासने लिहिला म्युझिक अल्बम

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती पॉपस्टार निक जोनास हे कायमच चर्चेत असतात. दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोज सोशल मीडियावरून शेअर करत असतात. निक जोनासचा एक अल्बम लवकरच रिलीज होणार आहे. त्याबद्दल बोलताना त्याने प्रियांकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘स्पेसमॅन’ हा त्याचा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल बोलत असताना निक सांगत होता की, कशाप्रकारे त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली आणि ह्या अल्बमसाठी प्रेरणा दिली. तो तिला मिस करत असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं. प्रियांका सध्या युरोपमध्ये शूटिंग करत आहे तर निक काही महिन्यांपासून अमेरिकेत आहे.

‘द टुनाईट शो’ या कार्यक्रमात तो बोलत होता. तो म्हणाला, “मी ह्या अल्बमसंदर्भातलं लिखाणाचं काम गेल्या वर्षीच्या जुलैमध्येच सुरु केलं होतं. त्यावेळी माझी पत्नी तिच्या द मॅट्रिक्स या चित्रपटाच्या कामानिमित्त जर्मनीमध्ये होती. आणि मी असा होतो की, मला सगळ्या जगापासून तुटल्यासारखं वाटायचं आणि सगळ्यात जास्त माझ्या जवळच्या माणसापासून.”

तो पुढे असंही म्हणाला की, तिला खूप मिस केल्यानंतर जेव्हा अखेर ते पुन्हा भेटले, एकमेकांशी पुन्हा जोडले गेले, त्यावेळी त्याला त्याच्या या अल्बमची थीम सापडली. भविष्याबद्दल आणि पुढचा उज्ज्वल दिवस पाहायला मिळेल हा आशावाद अशी या अल्बमची थीम आहे.

निक कायमच आपल्या मुलाखतींमधून प्रियांकाबद्दलचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत असतो. ‘ऍप्पल म्युझिक’ला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो, “स्पेसमॅन हे माझ्या पत्नीला लिहिलेलं प्रेमपत्र आहे. कारण ज्यावेळी मला असं वाटतं की, मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही तेव्हा मी स्टुडिओत जातो आणि गाण्यातून त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे ही गोष्ट आहे याचा मला आनंद आहे. कारण याच गोष्टीमुळे ती खूश असते आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

‘स्पेसमॅन’ हा अल्बम 12 मार्चला रिलीज होणार आहे. यातलं एक गाणं ‘धिस इज हेवन’ नुकतंच निकने शेअर केलं आहे. निक आणि प्रियांका गेल्या वर्षी जोनास ब्रदर्सच्या ‘सकर’ या गाण्यात एकत्र दिसले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 4:29 pm

Web Title: my album is the love letter for my wife priyanka chopra said nick jonas vsk 98
टॅग : Priyanka Chopra
Next Stories
1 ‘तो कुठे आहे…’, वयाच्या ४२व्या वर्षी अभिनेत्री शोधतेय लग्नासाठी मुलगा
2 जावेद अख्तर बनवणार राखी सावंतच्या जीवनावर आधारित चित्रपट?
3 अनुराग- तापसीने केली चित्रीकरणाला सुरुवात? अनुरागचं नवं ट्विट चर्चेत
Just Now!
X