शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर कंगनावर जोरदार टीका झाली. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिले. आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे कंगनाने म्हटले. त्यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे असे म्हटले. त्यांच्या या ट्विटवर अभिनेता सुमीत राघवनने पोस्ट करत सवाल उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- कर्मभूमी मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही – कंगना रणौत

Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
kiran mane post for uddhav thackeray
“त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ केलं नाही,” उद्धव ठाकरेंबद्दल अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले, “काळाची पावलं…”

सुमीतने पोस्टमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत संजय राऊत यांना त्यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ‘सर, माझे बाबा मराठी नाहीत, मीही नाही. माझा जन्म इथेच झाला. पण मी इतरांपेक्षा चांगले मराठी बोलू शकतो. गेल्या ३० वर्षांपासून मी मराठी रंगभूमीवर काम करत आहे. माझी मुले मराठी शाळेत शिकली. मी म्हणतो मुंबई कोणाच्याच बापाची नाहीए. मी दुश्मन झालो का? अतिशय चुकीचे विधान आहे तुमचे’ असे सुमीतने पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- “स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही”

आणखी वाचा- “…हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा,” कंगनाच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

काय होतं संजय राऊत यांचे ट्विट?

मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे.. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.