News Flash

माझा पार्टनर हॉट नसला तरी चालेल- आलिया भट्ट

माझे लग्न होईपर्यंत मी तरूण राहीन, याची मला खात्री नाही.

Alia Bhatt : आयुष्याच्या जोडीदाराबाबत माझ्याही अपेक्षा चारचौघांसारख्यात आहेत. तो मला खूप हसवणारा आणि माझ्यावर प्रेम करणारा असावा, हीच माझी मुख्य अपेक्षा असल्याचे आलियाने सांगितले.

माझ्या आयुष्यातील जोडीदार हॉट किंवा युथ आयकॉन नसला तरी चालेल, असे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने म्हटले आहे. आलियाला एका कार्यक्रमात तुला आयुष्यात कशाप्रकारचा पार्टनर हवा, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आलियाने म्हटले की, आयुष्याच्या जोडीदाराबाबत माझ्याही अपेक्षा चारचौघांसारख्यात आहेत. तो मला खूप हसवणारा आणि माझ्यावर प्रेम करणारा असावा, हीच माझी मुख्य अपेक्षा असल्याचे आलियाने सांगितले. जोडीदाराची निवड करताना तो दिसायला कसा आहे, हा माझ्यासाठी तितकासा प्राधान्याचा मुद्दा नसेल. मी इतक्यात लग्न करणार नसले तरी माझा लाईफ पार्टनर युथ आयकॉन नसावा, असे मला वाटते. कारण माझे लग्न होईपर्यंत मी तरूण राहीन, याची मला खात्री नाही, असे आलियाने यावेळी सांगितले. तसेच माझा जोडीदार हॉट असेल किंवा नसेल याबद्दल मला तितकेसे देणेघेणे नाही. तो फक्त चांगला माणूस असला पाहिजे. तसेच तो मजेशीर स्वभावाचा, जबाबदार आणि मुख्य म्हणजे तो माझ्यावर प्रेम करणारा असला पाहिजे, असे आलियाने यावेळी म्हटले. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टने बॉलिवूड किंग शाहरूख खान याच्यासोबत टेलिव्हिजनवरील ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. येत्या २३ नोव्हेंबरला आलिया आणि शाहरूख खान यांचा ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. आलिया या दृष्यात मुलं कशा प्रकारची असतात यावर बोलताना दिसत आहे. मुलांना कसे डेट करावे, डेटला गेलो तर कसं वागायचं, कुठले कपडे घालायचे आणि अशा अनेक गोष्टी… तिच्या या गोष्टी ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तिच्या तोंडून ही वाक्य ऐकून तुम्हाला वाटेल की हे तर आपल्याच आयुष्याशी निगडीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 11:00 am

Web Title: my life partner will not be a youth icon and not necessarily hot alia bhatt watch video
Next Stories
1 करण जोहर करणार ‘सैराट’चा रिमेक?
2 Salman khan Nephew: ‘सलमान माझ्या मुलाला बिघडवतोय’
3 ..म्हणून चाहत्यांपासून दूर जाणार रणबीर कपूर
Just Now!
X