चंदेरी दुनियेमध्ये प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री यांचे स्वतंत्र वैशिष्ट आहे. कोणी त्यांच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात तर कोणी त्यांच्या ब्रॅण्डेड वस्तूंमुळे मात्र एक असा अभिनेता आहे जो त्याच्या अभिनयाबरोबरच तल्लख बुद्धीमत्तेमुळेदेखीलओळखला जातो. तो म्हणजे विकी कौशल.  नुकतीच विकीने त्याच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ‘रमन राघव २.०’ या चित्रपटामध्ये विकीने केलेली भूमिका पाहून त्याच्या आईने त्याचा तिरस्कार केला होता असे विकीने स्वत: सांगितले.

‘रमन राघव २.०’ चित्रपटामध्ये विकीबरोबर अभिनेता नवाजुद्दीन सिद्धकी यांनीदेखील स्क्रिन शेअर केली होती. यात विकी एक भ्रष्ट पोलीस अधिका-याच्या भूमिकेत दिसून आला होता. हे पात्र इतकं बिभीत्स होतं की त्याच्या कामामुळे कोणालाही त्याचा तिटकारा येईल. हा भ्रष्ट पोलीस अधिकारी कोणताही गुन्हा करताना मागचा पुढचा विचार करत नसे. या चित्रपटातील विकीची भूमिका पाहून त्याच्या आईने त्याला भूमिका न आवडल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

‘तुझ्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका मी आवडीने पाहीन. तु माझा मुलगा असल्यामुळे तुझा तिरस्कार करणे मला शक्य नव्हते. मात्र तू निवडलेली ही भूमिका पाहून या पात्राबरोबरच मला तूझादेखील तिटकारा येतो’ असे विकीच्या आईने सांगितले. परंतु माझ्या अभिनयामुळे चित्रपटातील पात्र जिवंत वाटत होते. त्यामुळेच आईने अशी टीका केली. आईने केलेली ही टीका एक प्रकारे माझी प्रशंसाच होती, असे विकीने सांगितलं.

विकी ‘मसान’ व्यतिरिक्त ‘रमन राघव २.०’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘राजी’ या चित्रपटामध्ये झळकला आहे. विकी कायमच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याचा प्रयत्न करत असतो.