News Flash

.. म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी त्याला मानते अशुभ

तेव्हा मला तिच्या जवळपास उभंसुद्धा राहू देत नाही.

इम्रान हाश्मी आणि त्याची पत्नी परवीन

बॉलिवूडमध्ये अभिनेता इम्रान हाश्मी हा ‘सीरियल किसर’ म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात चुंबन दृश्य देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बादशाहो’ फेम या अभिनेत्याने त्याचे वैवाहिक आयुष्य आणि पत्नीबद्दल काही गोष्टी सांगितल्या. पण तुम्हाला माहितीये का, इम्रानची पत्नी परवीन त्याला ‘अनलकी’ म्हणजे अशुभ मानते. मात्र तुम्ही काहीही तर्कवितर्क लावण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो.

वाचा : कंगनासोबतचा वाद विसरून आदित्य पांचोलीने पाहिला ‘सिमरन’!

‘पोकर’ या खेळाची आवड असलेल्या परवीनला इम्रान तिच्यासाठी या खेळात अनलकी असल्याचे वाटते. यासंबंधी एका मुलाखतीत इम्रान म्हणाला की, पोकरमध्ये मी कधीच जिंकलो नाही पण, माझी पत्नी यात निष्णात आहे. ती जेव्हा तिच्या मित्रांसोबत पोकर खेळते तेव्हा मला तिच्या जवळपास उभंसुद्धा राहू देत नाही. या खेळात मी परवीनला तिच्यासाठी अशुभ वाटतो. ‘द स्पाटर्न पोकर्स इंडिया पोकर चॅम्पियनशिप पुरस्कार’ सोहळ्याला इम्रानने हजेरी लावली होती.

वाचा : Revealed ‘टायगर जिंदा है’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘सुई धागा’, ‘संदीप और पिंकी फरार’ या दिवशी होणार प्रदर्शित

पोकर खेळाविषयी इम्रान म्हणाला की, कोणत्याही खेळात निष्णात होण्यासाठी त्याबद्दल खोल अभ्यास करण्याची गरज असते. हीच गोष्ट पोकरमध्येही लागू होते. पोकरविषयी आता लोकांची मानसिकता बदलत असून, त्याला हळूहळू खेळाचे महत्त्व प्राप्त होतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:03 pm

Web Title: my wife considers me unlucky in poker says emraan hashmi
Next Stories
1 कंगनासोबतचा वाद विसरून आदित्य पांचोलीने पाहिला ‘सिमरन’!
2 शिल्पा शेट्टीच्या स्कार्फची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
3 VIDEO : सलमान-अहिलची ‘ब्रेकफास्ट’ डेट
Just Now!
X