News Flash

LGBTQ विषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर निशिगंधा वाड यांनी मागितली माफी

निशिगंधा वाड यांनी मागितली माफी, म्हणाल्या...

मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून कायमच निशिगंधा वाड यांच्याकडे पाहिलं जातं. उत्तम अभियनशैलीसोबत वागण्या-बोलण्यातील नम्रता यासाठी खास करुन निशिगंधा वाड यांची चर्चा असते. अलिकडेच त्यांनी एका शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या मुलाखतीत त्यांनी LGBTQ या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं होतं. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर निशिगंधा वाड यांनी माफी मागितली आहे.

अभिनेत्री सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या शोमध्ये निशिगंधा वाड यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअर, पर्सनल लाइफसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यात समलैंगिक संबंध या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या मुलाखतीत बोलत असताना ‘मला निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडासा पचनी पडत नाही’, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. मात्र, वाढता वाद लक्षात घेता त्यांनी माफी मागितली आहे.

वाचा : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मधून सारा अली खान आऊट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

“LGBTQ समूह किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण जर माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. मी सामाजिक क्षेत्रात काम करते. तसंच तृतीयपंथीयांसोबतही काम करते. कोणावरही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. गे असणं किंवा लेस्बियन असणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या संदर्भात मी बोलू शकत नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्तीदेखील नाही”, असं म्हणत निशिगंधा वाड यांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाल्या होत्या निशिगंधा वाड?

‘मला निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडासा पचनी पडत नाही. समलिंगी संबंधांविषयी माझं व्यैयक्तिक मत थोडं वेगळं आहे. खरं तर मी या मुद्द्यावर बोलणं माझ्या मुलीला आवडत नाही. आताच्या पिढीला वाटतं की हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? तुम्ही नॉर्मल नाहीत का?. प्रत्येकाला वैयक्तिक आवडीनिवडीचं प्राधान्य आहे. प्रत्येकाला निवडीचा अधिकार आहे. पण त्यावर उपचारदेखील आहेत की. अशा लोकांबद्दल आपण मानवी हक्कांबद्दल बोलतो. मला सगळ्या गोष्टी समजतात असं नाही. पण अशा जोडप्यांनी एखादं मुल दत्तक घेतलं तर त्या मुलाच्या मानवी हक्काचं काय?’, असं निशिगंधा वाड म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, ‘अशा जोडप्यांनी मुलं दत्तक घेतल्यानंतर त्यांनी नैसर्गिक आई आणि वडील यांची ओळख करुन द्यायची?त्यांच्या मानवी हक्कांचं काय? त्यांना ह्यूमन राईट्सबद्दल समजेपर्यंत ते गोंधळेली नसतील का?  दरम्यान, निशिगंधा वाड यांनी LGBTQ या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 9:51 am

Web Title: my words are being misconstrued says nishigandha wad lgbtq ssj 93
Next Stories
1 रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मधून सारा अली खान आऊट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
2 राज कपूर, दिलीप कुमार यांच्या घरांचे पाकिस्तानात जतन
3 IFFI साठी ‘छिछोरे’ची निवड; सुशांतच्या अनुपस्थितीमुळे श्रद्धा झाली भावूक
Just Now!
X