News Flash

PHOTO: मयुरी वाघ-पियुष रानडेचं शुभमंगल!

मयुरी आणि पियुषला त्यांच्या कलाकार मित्रांनी पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ आणि ‘अस्मिता’ या मालिकेत तिचा जोडीदार असलेला अभिनेता पियुष रानडे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. बडोद्याला मयुरी आणि पियुषचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मयुरीच्या विवाहसोहळ्याची रंगत अणखीनच वाढवली. पियुष आणि मयुरी यांची ओळख झी मराठीवरील ‘अस्मिता’ या मालिकेत झाली होती. त्यानंतर हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मयुरी-पियुषच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी त्यांच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री श्रेया बुगडेचाही समावेश आहे. श्रेयाने मयुरीसोबतचे काही फोटो शेअर करत तिला आणि पियुषला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मराठी चित्रटपसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकापाठोपाठ एक ही कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ‘पुढचं पाऊल’ फेम अभिनेता संग्राम समेळ याचा १ डिसेंबरला विवाह सोहळा पार पडला. संग्रामचं ‘रूंजी’ मालिकेतील अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी विवाह झाला. त्यानंतर चिराग पाटील, गौरव घाटणेकर, मृण्ययी देशपांडे, श्रुती मराठे, अतुला दुग्गल यांच्यापाठोपाठ आता ‘अस्मिता’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली मयुरी वाघ आणि पियुष रानडे या जोडीचं नावही या यादीत नव्याने समाविष्ट झालं आहे.

‘अस्मिता’ मालिकेमधून या दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे टेलिव्हिजनवरील ‘रील लाइफ’ जोडी आता ‘रिअल लाइफ’ जोडी बनणार आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. पियुष हा संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या ‘लाल इश्क’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तर दुसरीकडे मयुरीने ‘वचन दिले तू मला’, ‘ही वाट दूर जाते’, ‘मेजवानी’, ‘सुगरण’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 10:16 am

Web Title: myuri wagh tied a knot with piyush ranade
Next Stories
1 ‘मृत्युंजय’मधील व्यक्तिरेखांचं चित्रण मला भावलं -लीना भागवत
2 PHOTO: ‘फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड’सह किंग खान फोटोसाठी पोझ देतो तेव्हा..
3 कथा पोलिसांच्या शोधाची आणि हुशारीची
Just Now!
X