News Flash

‘नामकरण’मधील अभिनेता झैन इमामच्या भावाचे करोनाने निधन

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

काल अभिनेत्री निक्की तांबोळीचा भाऊ जतिनचे करोनामुळे निधन झाल्याचे समोर आले. आता त्यापाठोपाठ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता झैन इमामच्या चुलत भावाचे करोनामुळे निधन झाले आहे. झैनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

‘नामकरण’ मालिकेत काम करणाऱ्या झैनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावासोबतचे फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत त्याने ‘आम्ही आमचा सर्वांचा लाडका आणि मोठा चुलत भाऊ कुकूला गमावले आहे. त्याने सर्वांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली होती. माझा अजूनही विश्वास बसत नाही की भाईजान तू आम्हाला इतक्या लवकर सोडून गेलास. आम्हा सर्वांचा विश्वास होता की तू लवकर बरा होऊन घरी परत येणार. पण अल्लाहचा काही वेगळाच प्लॅन होता’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : करोनामुळे निक्की तांबोळीच्या भावाचे निधन

पुढे झैन म्हणाला, ‘इंडस्ट्रीने एक लेखक, कवी आणि चांगला व्यक्ती गमावला आहे. १० दिवसांपूर्वीच तू तुझ्या अम्मीला गमावले होते. तू बरा होऊन घरी परतशील असे वाटले होते पण… कुटुंबीयांसोबतच तुझी राइयटर टीम देखील तू लवकर बरा व्हावा यासाठी सर्व प्रयत्न करत होती.’ या पोस्टमध्ये झैनने त्याला मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 11:45 am

Web Title: naamkarann actor zain imam cousin brother dies of corona avb 95
Next Stories
1 ‘दृश्यम-2’चे निर्माते कुमार मंगत यांच्यावर खटला दाखल; हिंदी रिमेकआधीच नवा वाद
2 अदाकारीने मनोरंजन करणारी जॅकलीन फर्नांडिस लोकांची भूक मिटवणार; ‘योलो’ फाऊंडेशनची केली स्थापना
3 लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर मैत्रिणीने केला खुलासा
Just Now!
X