News Flash

अभिनेत्रीवर रुममेटचा जीवघेणा हल्ला, चेहरा केला विद्रूप

रुममेटच्या आईने नलिनीला काचेचा ग्लास फेकून मारला.

नलिनी नेगी

टीव्ही अभिनेत्री नलिनी नेगी हिने रुममेट व तिच्या आईने मिळून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. रुममेट प्रीती राणा व तिच्या आईने मिळून केलेल्या मारहाणीविरोधात नलिनीने ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नलिनीने सांगितले, ”गेल्या काही वर्षांपासून मी प्रीतीसोबत राहत होती. काही महिन्यांपूर्वी मी ओशिवरामध्ये फ्लॅट घेतला आणि तिथे राहू लागली. फ्लॅट घेतल्याच्या काही दिवसांनंतर प्रीती माझ्याकडे आली आणि तिने माझ्यासोबत राहण्याची विनंती केली. मला माझ्या आई-वडिलांसोबत राहायचं होतं म्हणून मी नवीन फ्लॅट घेतला होता. त्यावेळी माझे आई-वडील दिल्लीत माझ्या बहिणीकडे होते. म्हणून प्रीतीला माझ्यासोबत राहण्यास होकार दिला. पण माझे आई-वडील परत आले की, तुला इथून जावं लागेल असं प्रीतीला सांगितलं होतं. त्यानंतर प्रीतीसोबत तिची आईसुद्धा माझ्या फ्लॅटमध्ये राहायला आली. मी काहीच बोलले नाही. प्रीतीची मदत करण्यासाठी त्या आल्या असतील असं मला वाटलं. पण गेल्या आठवड्यात मी जिमला जाण्यासाठी निघताना अचानक प्रीतीच्या आईने माझ्याशी भांडण केलं. आईसोबत प्रीतीसुद्धा माझ्याशी भांडू लागली. मी काही बोलणार इतक्यात तिच्या आईने मला काचेचा ग्लास फेकून मारला. त्या दोघांनी मला खूप मारहाण केली. माझ्यावर जीवघेणा हल्लाच केला.”

प्रीती व तिच्या आईने चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप नलिनीने केला आहे. या घटनेबद्दल कळताच नलिनीचे आई-वडील मुंबईला आले असून त्यांनी प्रीती व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नलिनीने ‘नामकरण’, ‘विश’ या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. त्याचसोबत ती ‘स्प्लिट्सविला’ या शोमध्येही झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 5:22 pm

Web Title: naamkarann actress nalini negi files fir against roommate for physical assault ssv 92
Next Stories
1 रानू मंडल यांचे बॉलिवूडशी आहे जुने कनेक्शन
2 लढवैय्या गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत जान्हवी कपूर, पाहा फर्स्ट लूक
3 सेम टू सेम! हुबेहूब अक्षयसारखा दिसणारा ‘हा’ आहे तरी कोण?
Just Now!
X