जगभरात करोना विषाणूची दहशत पसरली असताना प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करण्याचा, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. रविवारी जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण भारतातील लोक घरी बसले होते. कधीही न थांबणारी मुंबईसुद्धा करोनामुळे थांबली होती. मात्र अशा परिस्थितीत माणूसकी थांबली नाही. प्रसिद्ध मराठमोळा फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे याच्या वडिलांनी सर्वांसमोर आदर्शाचं उदाहरण दिलं.

नचिकेत बर्वेचे वडील हे नामांकित सर्जन व हार्ट स्पेशलिस्ट आहेत. रविवारी जनता कर्फ्यू असताना त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व रुग्णांसाठी घरून जेवणाचा डबा नेला. जनता कर्फ्यूमुळे सर्व सेवा बंद असताना जेवणाची सोय करणं अवघड असल्याची जाणीव त्यांना होती. या जाणीवेपोटी त्यांनी दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसंच रुग्णांसाठीही जेवणाचा डबा नेला.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

https://www.instagram.com/p/B-Br6cgDf0i/

आणखी वाचा : ‘मी टू’ आरोपांचा दोषी असलेल्या निर्मात्याला करोनाची लागण

नचिकेतनं इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. अशा अडीअडचणीच्या वेळी माझ्या आईने नेहमीच घरी जेवण बनवलं व संपूर्ण स्टाफसाठी डबा पाठवला. २००५ मध्ये आलेल्या पुरातही आईवडिलांनी ही माणुसकी दाखवली, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं.