‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘साहेब बिवी और गँगस्टर ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री नफिसा अली सोढी या साऱ्यांनाच ठावूक असतील. १९७६ ‘फेमिना मिस इंडिया’ ठरलेल्या नफिसा यांना काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरचे निदान झाले. मात्र या आजाराला त्या हसत-हसत सामोरं जात असून सोशल मीडियातून त्यांच्या प्रकृतीची माहिती देत असतात. अलिकडेच त्यांनी त्यांचा ‘मिस इंडिया’ झाल्यानंतर काढलेला एक जुना फोटो शेअर केला. सोबतच वडिलांची आठवणदेखील सांगितली.

“वयाच्या १९ व्या वर्षी ‘फेमिना मिस इंडिया’चा खिताब जिंकल्यानंतर माझ्या वडिलांनी अहमद अली यांनी हा फोटो काढला होता”, असं कॅप्शन देत नफिसा यांनी फोटो शेअर केला. नफिसा यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. विशेष म्हणजे त्यांचा फोटो पाहिल्यानंतर कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही.

 

View this post on Instagram

 

These were taken in Hyderabad. (Taken by Vinay Kumar )

A post shared by nafisa ali sodhi (@nafisaalisodhi) on


नफिसा यांनी जुनून या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. मात्र त्यांनी फार मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी पोलो खेळाडू कर्नल आर एस सोढी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी कलाविश्वातून काढता पाय घेतला.मात्र सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नफिसा कायम त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असतात. अलिकडेच त्यांना कर्करोगाचं निदान झालं असून त्यांना तिसऱ्या स्टेजचा कर्करोग आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी त्यांनी जीवनात काही अघटित होण्यापूर्वी मला माझ्या तिसऱ्या नातवंडाला पाहायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली.