X

VIDEO : …असा सजला समंथा- नागा चैतन्यचा लग्नमंडप

समंथा तिच्या चाहत्यांनाही या आनंदात सहभागी करुन घेतेय.

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांची लग्नघटिका समीप आली आहे. सध्या या लग्नसोहळ्यासाठी गोव्यात पाहुणे मंडळींची आगमन झाले आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या अकाऊंट्सवरुन ‘समचै’ म्हणजेच समंथा आणि नागा चैतन्यच्या लग्नसोहळ्या पूर्वीचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. ‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गोव्यातील ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये टॉलिवूडमधील या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला नागा चैतन्य, समंथा आणि त्यांचे कुटुंबिय त्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर या डेस्टिनेश वेडिंगचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये गोव्याच्या त्या आलिशान हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाचे सुरेख तंबू उभारल्याचं पाहायला मिळत आहे. त्याशिवाय समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्यही या वातावरणाला ‘चार चाँद’ लावत आहे.

सहसा एकाच विधीनुसार आणि रितिरिवाजांनुसार लग्न करण्याला प्राधान्य दिलं जातं. पण, समंथा- नागा चैतन्य यांची लग्नगाठ दोनदा बांधली जाणार आहे. हिंदू आणि ख्रिस्ती पद्धतींमधून ‘समचै’ एकमेकांची साथ देण्याचं वचनं देणार आहेत. आज, दुपारी समंथाचा ‘मेहंदी’ सोहळा पार पडेल. त्यामागोमाग जेवणं आटोपल्यानंतर मध्यरात्री हे दोघंजण लग्नाच्या बेडीत अडकतील.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण..

आजच्या या खास दिवशी समंथा तिच्या चाहत्यांनाही या आनंदात सहभागी करुन घेतेय. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती बऱ्याच ‘इन्स्टास्टोरी’ आणि काही फोटो पोस्ट करत आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्याबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांना प्रतिक्षा लागून राहिली आहे ती म्हणजे अस्सल दाक्षिणात्य नववधूच्या रुपात समंथा कशी दिसते याची. या उत्सुकतेसोबतच अनेकांनी ‘समचै’ना शुभाशिर्वादही दिल्याचं पाहायला मिळत आहे.

First Published on: October 6, 2017 4:19 pm
वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain