22 September 2020

News Flash

अभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका

५ हजार रुपये दंडासह तिचा जामीन मंजूर करण्यात आला.

‘नागार्जुन- एक योद्धा’ या मालिकेतील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटकेनंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. श्रुतीचा कोब्रासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे श्रुतीला अटक करण्यात आली होती. बुधवारी सोशल मीडियावर श्रुतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये ती हातात कोब्रा पकडून दिसत होती. तिच्या या व्हिडिओवर काही प्राणीमित्र संघटनांनी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर अभिनेत्रीवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये तिला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, बोरिवलीच्या न्यायालयाने गुरुवारी श्रुतीला जामीन मंजूर केल्यामुळे आता तिची सुटका झाली आहे. ५ हजार रुपये दंडासह तिचा जामीन मंजूर करण्यात आला.

sayali p

श्रुतीसह आणखी एक अभिनेत्री आणि मालिकेच्या दोन निर्मिती व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आल्याचे वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केले होते. वन्यजीव कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतवर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबई विभागातील काही वन अधिकाऱ्यांनी प्राणीमित्रांच्या सांगण्यावरुन ही तक्रार दाखल केली होती.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ २०१६ मध्ये आलेल्या नागार्जुन एक योद्धा या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी बनविण्यात आला होता, अशी माहिती समोर आली होती. पण, या मालिकेच्या निर्मिती संस्थेच्या म्हणण्यानुसार स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने हा कोब्रा बनविण्यात आला असून तो खरा साप नाहीये. पण, या प्रकरणाच्या तपासादरम्यान तो कोब्रा खरा असल्याचे उघड झाल्यामुळे श्रुती उल्फत चांगलीच पेचात सापडली होती. सदर प्रकरणी कारवाई सुरु असतानाच चौकशीदरम्यान श्रुती, तिची सह अभिनेत्री आणि इतर दोन व्यक्तिंनी तो साप खरा असल्याचे स्वीकारल्यामुळे त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मात्र आता जामीनावर तिची सुटका झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 5:36 pm

Web Title: nagarjuna actress shruti ulfat granted bail in posing with cobra case
Next Stories
1 प्रेमातला गुलाबी अनुभव सांगणारी ‘प्रेम हे.. ‘ नवी मालिका
2 हृतिक-सुझान पुन्हा विवाहबंधनात अडकणार?
3 जिया खानप्रकरणातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Just Now!
X