News Flash

..आणि नागार्जुनच्या मुलाचे लग्न मोडले

हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते.

akhil akkineni, shriya bhupal
अखिल अक्किनेनी, श्रिया भुपाल

कलाविश्वामध्ये क्षणात नाती बनतात आणि कोणतीही कल्पना नसताना याच नात्यात दुरावाही येतो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांच्या नात्यात दुरावा आल्याचे अनेकांनाच ठाऊक आहे. अशाच सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत आता अभिनेता नागार्जुनच्या मुलाच्या नावाचाही समावेश झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा अखिल अक्किनेनीचे त्याची प्रेयसी श्रिया भुपाल हिच्याशी ठरलेले लग्न मोडले आहे.

एका दिमाखदार सोहळ्यामध्ये या दोघांचाही साखरपुडा झाला होता. लग्न ठरण्याआधीच जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या प्रेमीयुगुलांनी हैद्राबाद येथील जीव्हीके हाउस येथे खासगी पद्धतीने साखरपुडा केला होता. अगदी नेमक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.

दरम्यान, साखपुड्यानंतर हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास सहाशे मंडळी भारतातून इटलीला जाणार असल्याचेही म्हटले जात होते. पण, अखिल आणि श्रिया यांच्या काही कारणावरून बिनसले आणि दोघांनीही हे नाते इथेच थांबविण्याचा निर्णय घेतला. श्रिया ही प्रसिद्ध व्यावसायिक जीव्हीके रेड्डी यांची नात असून, अभिनेता नागार्जुन आणि जीव्हीके रेड्डी यांनी या दोघांचीही समजूत काढली. पण, अखिल आणि श्रियावर त्याच्या काहीही परिणाम झाला नाही.

अखिल आणि श्रियाच्या लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे आमंत्रितांनी त्यांच्या लग्नाला जाण्यासाठीची तयारी आणि आरक्षण वगैरे करण्यास सुरुवात केली होती. पण, त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आता अनेकांच्याच मनात विविध प्रश्नांनी घर केले आहे. लग्नासाठी तयारीला लागलेल्या आमंत्रितांना त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचे वृत्तही इंडियन एक्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापर्यंत अखिल आणि श्रियाच्या नात्यात कोणताही वाद नसताना त्यांनी अचानक असा निर्णय घेतल्यामुळे सध्या याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात अखिल आणि श्रियाची भेट झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांनी वर्षाभरापूर्वीच आपल्या पालकांना त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत कल्पना दिली होती. दाक्षिणात्य फिल्मफेअरसाठी अधिकृतरित्या कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम पाहते. तिने टॉलिवूडमध्ये श्रिया सरण, काजल अग्रवाल, रकुल प्रित यांच्यासाठी काम केले आहे. तर बॉलीवूडमध्ये तिने श्रद्धा कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत काम केले आहे.

akhil-main-759

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 12:03 pm

Web Title: nagarjunas son akhil akkinehi called of may wedding with gvk reddy granddaughter
Next Stories
1 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर बिबट्याची दहशत
2 नाटकामुळे त्या तिघींची मैत्री झाली
3 शाहरुख, सैफ, अक्षयचा हा फोटो व्हायरल
Just Now!
X