होतकरु तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये केले. सोलापूरमध्ये वडार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. वडार समाजाला निधी देण्याची घोषणा करतानाच होतकरु तरुणांना व्यवसायासाठी निधी देणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे उदाहरण देत नागराजसारख्या दिग्दर्शकांना स्टुडियोसाठी जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले. नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत अतिशय दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली आहे. यामध्ये फँड्री, सैराट यांसारख्या चित्रपटांचे नाव प्रामुख्याने घेता येईल. वडार समाजाच्या पाठीशी उभे राहत त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार असल्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली आहे. होतकरू तरूणांसाठी, समाज भूषणांसाठी ज्या ज्या आवश्यकता असतील त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय विठ्ठलाचा रथ पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वडार समाजाशिवाय महाराष्ट्र पुढे कसा जाईल? असे सांगत मुख्यमंत्र्यांनी वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे जाहीर केले.

bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघा सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण